सकाळच्या टॉप घडामोडी : 30 सप्टेंबर 2022 - latur saptrang

Breaking

Friday, September 30, 2022

सकाळच्या टॉप घडामोडी : 30 सप्टेंबर 2022

 सकाळच्या टॉप घडामोडी : 30 सप्टेंबर 2022




▪️दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाचा टिझर रिलीज: बाळासाहेबांसह आनंद दिघेंचे फोटो, शिवसेनेचे नावही वापरले; ठाकरे-शिंदे गटात पोस्टर वाॅर


▪️रश्मी ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात: टेंभीनाका परिसरातील दुर्गेश्वरी देवीची केली महाआरती; शिवसैनिकांची मोठी गर्दी


▪️सुप्रिया सुळेंचा आरोप: गॅस सिलिंडर दरात भरमसाठ वाढ करून वापरावर मर्यादा आणली, ही केंद्र सरकारची असंवेदनशीलताच


▪️चंद्रकांत खैरेंचाही धमाका: म्हणाले - एकनाथ शिंदे 15 आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये जाणार होते, मला संजय शिरसाटांनीच सांगितले!


▪️चंद्रकांत खैरेंना वेड लागलंय: शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांचे प्रत्युत्तर; म्हणाले- त्यांनी या वयात तरी उपचार करून घ्यावेत


▪️सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल: सर्वच महिलांना सुरक्षित गर्भपाताचा हक्क! विवाहित किंवा अविवाहित असा भेदभाव घटनाविरोधी


▪️वाहनांना 6 एअरबॅग अनिवार्यचा निर्णय वर्षभर लांबणीवर: केंद्रीय मंत्री गडकरींची माहिती; 1 ऑक्टोबर 2023 पासून होणार अंमलबजावणी


▪️गेहलोत काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर: म्हणाले - मुख्यमंत्रिपदाचा निर्णय सोनिया घेतील, जे घडले त्याचे दुःख


▪️जसप्रीत बुमराहची T-20 विश्वचषकातून माघार: पाठीच्या दुखापतीमुळे घेतला निर्णय, मोहम्मद शमीला संधी मिळण्याची शक्यता


▪️दीपिकापासून विभक्त होण्याच्या वृत्तावर रणबीरची प्रतिक्रिया: म्हणाला- 'देवाची कृपा आहे आम्ही भेटलो आणि 10 वर्षांपासून एकत्र आहोत'



No comments:

Post a Comment