गवळीचा नाला परिसरात अपेरिक्षा - दुचाकी चा अपघात...!
तीन जन गंभीर...!
----------------------------------------------------
सोयगाव - /प्रतिनिधी मुस्ताक शाह
--------------------------
सोयगावपासुन अवघ्या तीन कि.मी.अंतरावर गवळणीचा नाला म्हणून प्रख्यात असलेल्या लघु तलाव परिसरात वळनावर शनिवारी (ता.३) अपेरिक्षा क्र.एम.एच.१९,एक.ई.९९०४,व मोटारसायकल एम.एच.२०,डी.एल.९३७८ घडकल्याने यात दोन तरुणांना गंभिर मार लागला असुन सोयगाव ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, शनिवारी सकाळी अपेरिक्षा चालक रमेश देविदास जाधव वय ३४ लिहातांडा ता.सोयगाव येथील महिला शेतमजुर घेवून जरंडी येथील प्रगत शेतकरी प्रदिप पाटील शेतीकासाठी जात असतांनाच समोरुन जरंडीकडून मोटारसायकल स्वार एकनाथ (बबलु) शंकर तोरे वय २२, संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे कर्मचारी भगवान सिताराम उसरे सोयगाव कडे येत असतांना वाहनांची समोरासमोर धडक झाली.
यात महाविद्यालयलयाचे भगवान उसरे, एकनाथ (बबलु) तोरे यांना डोक्यात , हातापायावर जबर मार लागल्याने सोयगाव ग्रा.रु.वैद्यकीय अधिकारी डॉ.शाम गायकवाड यांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव जिल्ह्या सामान्य रुग्णालयात जाण्यासाठी रेफरपत्र दिले.भगवान उसरे यास नातेवाईकांनी पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे नेले असल्याची माहीत नातेवाईकांनी दिली.अपेरिक्षा चालक रमेश जाधव यासही मार लागला असुनही स्व:ता पोलीस ठाण्यात हजर झाला.पुढील तपास सोयगाव पोलीस करीत आहेत.
~~
{अपघातात जखमी महिलाशेतमजुर संगिता चव्हाण ३० ,पुजा चव्हाण ३० , दिपाली चव्हाण १५ , देवकीबाई राठोठ ६० ,वैजंताबाई चव्हाण ६० , पुष्पाबाई चव्हाण १८ आदी जखमीवर प्रथमोपचार करण्यात आले.}
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
बाॅक्स :
---------
महाराष्ट्र शासनाने सुरु केलेली आरोग्य विभागाची १०८ सेवेचा पुरता बोजवारा उडाला...?
-------------
राज्य शासन दिवसेंदिवस सर्वसामान्यांच्या हीतासाठी सतत प्रयत्नशील असते मात्र अधिकारी या संतांच्या भुमित एहिक सुखापोटी व अभिलाषेने मानुसपण विसरत चालला आहे.सुखासाठी वाटेल ते करायला तयार आहे.त्यामुळेच समाजात अशांती, अविश्वास, संघर्ष, मानसिक ताण निर्माण होत आहे. शनिवारी अपघात झालेवर लागलीच पुणे बिव्हीसी स्थित १०८ कंट्रोल रुम मध्ये घटनास्थळावरुन अपघाता विषयी लागलीच सकाळी ८:५० पुर्वी माहीत दिली,मात्र एमरजन्सी सेवा उशीर होउनही मिळत नसल्याने,मानुसपण जपण्यासाठी मदतीचा हात म्हणून नागरीकांनी मोटारसायकल च्या सहाय्याने जखमिंना सोयगाव ग्रा.रु.पोहचवण्याचे धैर्य केल्याने वेळेवर उपचार मिळाले,अण्यथा उपचारा अभावी गंभिराचे प्राण गमवावे लागले असते, शासनाची आरोग्य विभागाची १०८ सेवा घटनास्थळी पोहोचलीच नाही. मात्र ग्रा.रु.पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालयात जळगाव साठी उपलब्ध झाली.१०८ चे चालक व वैद्यकीय अधिकारी यांचेवर कारवाई करावी अशी संतप्त नातेवाईकांनी केली आहे.
फोटोओळी :
१)गंभीर जखमीला उपचारासाठी मोटरसायकल च्या सहाय्याने नेतांना नागरिक
२)अपघात मोटारसायकल अशी चक्काचूर झाली. ३) याच ग्रा.रु.वै.अ.डाॅ.गायकवाड यांनी उपचार केले
४) अपघातात जखमी झालेला व्यक्ती
No comments:
Post a Comment