ट्रक-टेम्पोची धडक, काही क्षणांत आग, दोन्ही वाहनं जळून खाक, अपघाताचा थरार दाखवणारा व्हिडिओ - latur saptrang

Breaking

Sunday, September 4, 2022

ट्रक-टेम्पोची धडक, काही क्षणांत आग, दोन्ही वाहनं जळून खाक, अपघाताचा थरार दाखवणारा व्हिडिओ



ट्रक-टेम्पोची धडक, काही क्षणांत आग, दोन्ही वाहनं जळून खाक, अपघाताचा थरार दाखवणारा व्हिडिओ

पालघर: मुंबई-अहमदाबादhttps://www.latursaptrangnew.com/ राष्ट्रीय महामार्गावर एक अत्यंत भीषण असा अपघात घडला आहे. येथे ट्रक आणि टेम्पोची धडक होऊन दोन्ही वाहनांनी पेट घेतला. ज्यामध्ये दोन्ही वाहनं पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. ही वाहनं पेटल्याने महामार्गावर नुसती राखच राख पसरलेली होती. या घटनेत टेम्पो चालक जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओही पुढे आला आहे.
मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मेंढवण घाट परिसरात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका टेम्पोने गुजरात वाहिनीवर येऊन मक्याचे पीठ घेउन जात असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. त्यांनतर या दोन्ही वाहनांनी पेट घेतला आणि दोन्ही वाहनांना भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. काही वेळानंतर या वाहनांना लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

पाहा या घटनेचा थरारक व्हिडिओ -



व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की कशाप्रकारे ही दोन्ही वाहनं जळून खाक झाली आहेत. ट्रकमधील सामान रस्त्यावर विखुरलं आहे. वाहनं पूर्णपणे जळून खाक झाल्याने रस्त्यावर फक्त राख राख पसरली आहे.

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून टेम्पो चालक जखमी झाला आहे. जखमी टेम्पो चालकाला मनोर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रक आणि टेम्पोला लागलेल्या आगीत दोन्हीही वाहने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. या अपघातामुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील गुजरात वाहिनीवरील वाहतूक विस्कळीत झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहावयास मिळाले.

No comments:

Post a Comment