माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी माजी आमदार पाशा पटेल यांचे चिरंजीव ॲड. हसन पाशा पटेल यांच्या श्रद्धांजली सभेस उपस्थित राहून भावपूर्ण श्रद्धांजली केली अर्पण - latur saptrang

Breaking

Monday, September 5, 2022

माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी माजी आमदार पाशा पटेल यांचे चिरंजीव ॲड. हसन पाशा पटेल यांच्या श्रद्धांजली सभेस उपस्थित राहून भावपूर्ण श्रद्धांजली केली अर्पण

 



माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी

माजी आमदार पाशा पटेल यांचे चिरंजीव ॲड. हसन पाशा पटेल

यांच्या श्रद्धांजली सभेस उपस्थित राहून भावपूर्ण श्रद्धांजली केली अर्पण


लातूर प्रतिनिधी : ४ सप्टेंबर २०२२ :

माजी आमदार पाशा पटेल यांचे चिरंजीव ॲड. हसन पटेल यांचे नुकतेच आकस्मित निधन झाले आहे. यानिमित्ताने आज रवीवार दि. ४ सप्टेंबर रोजी औसा तालुक्यातील लोदगा येथील फिनिक्स फाउंडेशन येथे आयोजित श्रद्धांजली सभेस राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सहकाऱ्यांसह उपस्थित राहून, तसेच कबरीवर पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. शेतकऱ्यांचे नेते असलेले पाशा पटेल हे सर्वांच्या जिवाभावाचे मित्र आहेत. देशमुख कुटुंबीयांसोबतही त्यांचा स्नेह आहे, उच्चशिक्षित हसन यांच्या अकस्मित जाण्याने पटेल कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखात देशमुख कुटुंबीय सहभागी आहे, असे नमूद करून पटेल कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची ईश्वराने शक्ती प्रदान करावी अशी प्रार्थना श्रद्धांजली सभेत बोलताना केली.

यावेळी औसाचे आमदार अभिमन्यू पवार, कळवण नाशिकचे आमदार दिलीप बोरसे, माजी खासदार भूपेंद्रसिंग मान, राजस्थान येथील शेतकरी नेते रामपाल जाट, माजी आमदार वैजनाथदादा शिंदे, परवेज पाशा पटेल, अमर पाशा पटेल, लातूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य समद  पटेल, माजी सभापती ललितकुमार शहा, ॲड. फारुक शेख, लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, गणेश हाके, माजी महापौर सुरेश पवार, लोदगा गावचे सरपंच पांडुरंग गोमारे, आसिफ बागवान, मेनूद्दीन शेख आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीक पटेल कुटुंबीय मित्र परिवार उपस्थित होते.

आमदार अमित विलासराव देशमुख यावेळी बोलतांना म्हणाले की ॲड. हसन पाशा पटेल हे आपल्यातून निघून गेले आहेत. पटेल कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे, पटेल यांच्या कुटुंबासाठी आपण एकत्र आलो आहोत. माजी आमदार पाशा पटेल हे आपल्या सगळ्यांचे जीवाभावाचे आहेत त्यांचे देशमुख कुटुंबीय यासोबत पारिवारिक संबंध आहेत लोकनेते विलासराव देशमुख यांचा जीव त्यांच्यावर होता हे सगळ्यांना माहित आहे. शून्यातून विश्व निर्माण करणारे माजी आमदार पाशा पटेल ओळखले जातात. सामान्य माणसासाठी ते काम करीत असतात आम्ही सर्वजण पटेल कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. ॲड. हसन यांनी मुंबई उच्च न्यायालयात काम केले आहे. हसन यांनी पटेल परिवाराचे नाव उंचावण्याच काम केल आहे. देशभरातून आज लोक येथे आलेले आहेत. पंजाब, राजस्थान, हरियाणा येथून लोक आले आहेत. पटेल कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची ईश्वर शक्ती देवो असे सांगून आम्ही सर्वजण कायम माजी आमदार पाशा पटेल यांच्यासोबत आहोत, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली

 यावेळी माजी खासदार भूपेंद्रसिंग मान, शेतकरी नेते रामपाल जाट, ठाकुर, गणेश हाके, औसाचे आमदार अभिमन्यू पवार, कळवण नाशिकचे आमदार दिलीप बोरसे आदींनी आपले मनोगत व्यक्त करून ॲड. हसन पाशा पटेल यांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली, तर या शोकसभेचे सूत्रसंचालन व आभार गालिब शेख यांनी केले.




No comments:

Post a Comment