दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी
(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर ) : 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
🌧️ राज्यात पुढील 3-4 दिवस पावसाचे :
आता येत्या काही दिवसांत पुन्हा राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबईसह ठाणे परिसरात पावसाने आज चांगलीच हजेरी लावली. याचबरोबर मराठवाड्यातील लातूर, बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातही चांगलाच पाऊस पडला. दरम्यान, येत्या गुरुवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असून, आज पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.
⚖️ सत्तासंघर्षाच्या लढाईत शिंदे गटाची नवी चाल :
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात शिंदे गटाकडून सुप्रीम कोर्टात नवी चाल खेळली जाणार आहे. सत्तासंघर्षाबाबत निवडणूक आयोगापुढे सुरू असलेल्या कार्यवाहीला तातडीने ग्रीन सिग्नल द्यावा, अशी मागणी शिंदे गट आज कोर्टात करणार आहे. शिंदे गटाकडून त्यांचे वकील आज सुप्रीम कोर्टामध्ये तशी विनंती करणार असल्याची माहिती आहे.
🗣️ संघटनात्मक उभारणीवर लक्ष, बावनकुळेंचा निर्धार :
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सध्या बारामती दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी भाजपा पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच चांगली कामगिरी करण्याच्या दृष्टीने संघटनात्मक उभारणीवर लक्ष केंद्रीत करत असल्याचं सांगितलं. यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजपाचं 2024च्या विधानसभा निवडणुकांमध्ये 45हून जास्त जागा निवडून आणण्याचं लक्ष्य असेल, असा निर्धार व्यक्त केला
👀 परभणीच्या मनसे शहराध्यक्षांचा खून :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परभणी शहर अध्यक्ष सचिन पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवरुनही सचिन पाटील यांच्या खुनाची माहिती देण्यात आली आहे. सोमवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास सचिन पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसह शहरातील कार्यालयात बसलेले असतानाच यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.
💐 सायरस मिस्त्री पंचत्वात विलीन :
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या पार्थिवावर मंगळवारी वरळीच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची अंत्ययात्रा मुंबईच्याच वाळकेश्वर सी फेसिंग मेंशनमधून स्मशानभूमीपर्यंत पोहोचली. त्यानंतर पारशी रिती-रिवाजाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सायरस मिस्त्रींसाठी आयोजित प्रार्थना सभेत गायत्री मंत्र व गोविंद गोपाळचे भजन झाले.
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lets Talk ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 जाहिरातीसाठी संपर्क - 8888144111
No comments:
Post a Comment