पोलीस आयुक्तालयासमोर पेटवून घेतलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू,
पोलीस आयुक्तालयात जाळून घेतलेल्या विवाहित महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी (1 सप्टेंबर) दुपारी औरंगाबाद पोलीस आयुक्तालयासमोर या महिलेनं स्वतः जाळून घेतलं होतं. सविता दीपक काळे (वय 32 रा. मांडवागाव, ता.गंगापूर) असे महिलेचे नाव आहे. या महिलेला शेजाऱ्यांकडून नेहमी मारहाण होत होती. पोलिसात अनेकवेळा तक्रार जाखल करुन देखील शेजाऱ्यांचा त्रास सुरुच होता. त्यामुळं तिनं पोलीस आयुक्तालयासमोर स्वतः जाळून घेतलं होतं.
No comments:
Post a Comment