अमरावतीच्या धारणीत आदिवासी नृत्य व पारंपरिक पद्धतीने कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा सत्कार
माझा एक दिवस , माझ्या बळीराजासाठी या उपक्रम अंतर्गत कृषिमंत्री अब्दुल सत्तार आज अमरावतीच्या मेळघाट दौऱ्यावर आहेत . सदरील भाग हा अतिशय दुर्गम, डोंगराळ व आदिवासी बहुल गावे आहेत. दौऱ्यात मंत्री अब्दुल सत्तार धारणी येथे आले होते. यावेळी
डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन ( CBBO ) व राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक ( नाबार्ड ) 10 हजार शेतकरी उत्पादक संघटना FPO निर्मिती आणि प्रोत्साहन योजना अंतर्गत ताप्तीपुत्र जैविक शेती मिशन शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने धारणी जि.अमरावती येथे पारंपरिक आदिवासी नृत्याने कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे स्वागत करण्यात आले. तसेच आदिवासी संस्कृती नुसार मंत्री अब्दुल सत्तार यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार राजकुमार पटेल, जिल्हाधिकारी पवणीत कौर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पांडा, माजी आ. प्रभूदास भिलावेकर, साद्राबादी गावच्या सरपंच लक्ष्मीबाई पटेल, भिभागीय कृषी सह संचालक किसन मुळे, जि.प. सदस्य रामगोपाल मावस्कर, धरणी पं. स.चे माजी सभापती रोहित पटेल, तहसीलदार प्रदीप शेवाळे, जिल्हा कृषी अधीक्षक अनिल खर्चान , प्राप्तीपुत्र शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष राजाराम जावरकर, औरंगाबाद जि.प. माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, जि.प. सदस्य गोपीचंद जाधव, सतिष ताठे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment