मुंबई, दि. 15 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात कौशल्य विकास आयुक्त तसेच महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवरुन शुक्रवार दि. 16 सप्टेंबर व शनिवार दि. 17 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. वरिष्ठ सहायक संचालक अर्चना शंभरकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.
या मुलाखतीत मराठवाडा मुक्ती दिन तसेच मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या महारोजगार मेळाव्याबाबतची सविस्तर माहिती श्री.कुशवाह यांनी दिली आहे. तसेच युवकांनी या महारोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात केले आहे.
00000
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/zQdY7EU
https://ift.tt/yfSros7
No comments:
Post a Comment