गुवाहाटी : आसाममधील धुबरी जिल्ह्यातील ब्रह्मपुत्रा नदीत आज गुरुवारी सुमारे ३० जणांना घेऊन जाणारी नाव उलटून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत अनेकजण बुडण्याची भीती आहे. धुब्रीचे उपायुक्त अनबामुथन एमपी यांनी या दुर्घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, अजूनही ६ ते ७ लोक अद्याप बेपत्ता आहेत. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. या घटनेत धुबरी विभागीय अधिकारी संजू दासही बेपत्ता झाल्याची माहिती आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेंद्र देव त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बचाव पथकाने नदीत बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. (a boat carrying 30 people capsized in the brahmaputra river)
या अपघाताची माहिती देताना ज्ञानेंद्र देव त्रिपाठी म्हणाले की, धुबरी-फुलबारी पुलाजवळ एक छोटी जलवाहिनी आहे. लाकडी नावेवर कालवा ओलांडत असताना ही नाव प्रवाहात कशावर तरी आदळली आणि उलटली. बोटीत सुमारे ३० लोक होते, त्यापैकी बरेच लोक धुबरी मंडळ कार्यालयातील होते.
दुर्घटनग्रस्त लोकांपैकी ज्यांना पोहता येत होते असे लोक वाचले. राज्य आपत्ती प्रतिसाद दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि सीमा सुरक्षा दलाची पथके शोध आणि बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आली आहेत, अशी माहिती ज्ञानेंद्र देव त्रिपाठी यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment