दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी
💁♂️ एलपीजी ग्राहकांसाठी अत्यंत मोठी बातमी! :
घरगुती एलपीजी ग्राहकांना आता सिलेंडरसाठी रेशनिंग प्रक्रियेला सामोरं जावं लागणार आहे. नव्या नियमांनुसार एका कनेक्शनवर वर्षभरात आता केवळ 15 सिलेंडर मिळणार आहेत. घरगुती एलपीजी ग्राहकांना 15 पेक्षा जास्त सिलेंडर दिले जाणार नाहीत. त्यासोबतच एका महिन्याचा कोटाही निश्चित करण्यात आला आहे. कोणताही ग्राहक एका महिन्यात दोनपेक्षा जास्त सिलेंडर घेऊ शकणार नाही.
😊 सर्वच महिलांना सुरक्षित गर्भपाताचा हक्क!
सर्वोच्च न्यायालयाने गर्भपातावर मोठा निर्णय दिला आहे. सर्व महिलांना सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपात करण्याचा अधिकार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. विवाहित आणि अविवाहित महिलांमध्ये भेदभाव करणे घटनाबाह्य आहे. एका महत्त्वपूर्ण निर्णयात न्यायालयाने म्हटले आहे की, विवाहित आणि अविवाहित महिलांमध्ये कोणताही भेदभाव केला जाऊ शकत नाही.
🗣️ पुन्हा सत्तेत येण्यासाठी पवारांचा एक दौरा पुरेसा' :
शरद पवारांचा एक महाराष्ट्राचा दौरा झाला की, ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात, असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. त्या इंदापूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत होत्या. शरद पवारांची 27 वर्षे सत्तेत गेली आणि 27 वर्षे विरोधात गेली. शरद पवार विरोधात असताना महाराष्ट्राचा एक दौरा करतात, या दौऱ्यात काय गंमत होते माहित नाही, पण त्यांचा दौरा संपला की ते सत्तेत येतात, असा दावाही सुळेंनी केला.
🧐 'सरस्वती' वादावर छगन भुजबळांचं स्पष्टीकरण :
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी “सर्व शाळांमध्ये महापुरुषांचे फोटो असावेत. फक्त तीन टक्के लोकांना शिकवून आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवणाऱ्या सरस्वतीची पूजा कशासाठी करायची?” असं वक्तव्य केलं होतं. यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला. दरम्यान आता या वक्तव्याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, माझ्या वक्तव्याचं राजकारण केलं जात आहे. समता परिषदेच्या कार्यक्रमात मी केवळ माझं मत मांडलं होतं.
💥 पुण्यात भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने 4 रिक्षा :
पुण्यात हडपसर येथे कंटेनरने चार रिक्षा आणि कारला उडवले आहे. या भीषण अपघातात 1 ठार तर 3 जखमी झाले आहेत. अपघात एवढा भीषण होता की कंटेनर एका झाडाला धडकुन पलटी झाला. हे झाड कोसळून एका नागरिकाच्या अंगावर पडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. कंटेनर खाली रिक्षा आल्याने त्याचा चक्काचूर झाला आहे.
No comments:
Post a Comment