फडणवीसांना अडाण्याच्या हाताखाली काम करावं लागतय; राऊत - latur saptrang

Breaking

Sunday, September 18, 2022

फडणवीसांना अडाण्याच्या हाताखाली काम करावं लागतय; राऊत

 



फडणवीसांना अडाण्याच्या हाताखाली काम करावं लागतय; राऊत

मुंबई - उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटातील वाद विकोपाला जात आहेत. त्यातच टीका करण्याची पातळी देखील दिवसेंदिवस खालावताना दिसत आहे. मात्र या दोघांमध्ये भाजपला देखील ओढलं जात असून आज शिवसेना नेते विनायक राऊत यांनी शिंदे गटासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली आहे. (VInayak raut news in Marathi)

खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना अत्यंत खालच्या पातळीचे शब्द वापरले. राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना एकट पाडायचं, शिवसेना संपवायची, शिवसेनेचे नाव पुसून टाकायचं. आणि या ### ४० गद्दारांच्या माध्यमातून शिवसेना संपवण्याचा जो धंदा आहे, तो उधळून टाकायचा आहे. शिवसेना फक्त बाळासाहेबांची आहे, उद्धव साहेबांची आहे हे दाखवून देण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल, असंही राऊत म्हणाले.

दरम्यान महाराष्ट्राला उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून येणारा प्रकल्प गुजरातला पाठवण्याचं पाप शिंदे सरकारने केल्याचं राऊत म्हणाले. यावेळी राऊत यांनी फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस सारख्या हुशार आणि अभ्यासू माणसावर दुर्दैवाने वाईट दिवस आले. त्यांना दुधाची तहान ताकावर भागवावी लागत आहे. त्यामुळेच फडणवीसांना या अडाण्याच्या हाताखाली काम करावं लागत असल्याची जहरी टीका राऊत यांनी केली.

एकना शिंदे यांना आता मराठी माणूस आठवत आहे. तेही गुवाहाटी आणि गुजरातला जावून अशी टीकाही विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.

No comments:

Post a Comment