दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी
(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर ) : 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
👍 शिंदे गटाचा दसरा मेळावा बिकेसीवरच :
विजयादशमीनिमित्त मुंबईच्या शिवाजी पार्कवर कुणाला परवानगी हा प्रश्न अनुत्तरीत असतानाच शिंदे गटाने 'एमएमआरडीए'कडे बीकेसी मैदानासाठी अर्ज केला होता. तो स्वीकारण्यात आला आहे, तर शिवसेनेने ज्या मैदानासाठी अर्ज केला ते मैदान आरक्षित असल्याने त्यांचा अर्ज फेटाळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
👀 अंबाबाई मंदिर 'या' तारखेला दर्शनासाठी बंद राहणार :
नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात स्वच्छता सुरू आहे. मंदिराच्या गाभार्याची व दागिन्यांची स्वच्छता बुधवारी (दि. 21) करण्यात येणार आहे. यामुळे त्या दिवशी अंबाबाईचे दर्शन बंद राहणार आहे. मात्र, भाविकांसाठी देवीची उत्सवमूर्ती दर्शनासाठी सरस्वती मंदिर येथे ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, आजपासून रविवारपासून मंदिराच्या शिखरांची रंगरंगोटी सुरू करण्यात येणार आहे.
🗣️ निवडणुकासाठी कामाला लागा; 'राज' यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना :
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विदर्भात पक्षबांधणीसाठी पाऊले उचलले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून 2 दिवस विदर्भ दौऱ्यासाठी ते आज विदर्भ एक्स्प्रेसने सकाळी 8.45 च्या सुमारास नागपूर मुख्य रेल्वेस्थानकावर पोहचले. त्यांचे तेथे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. यावेळी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. त्यानंतर राज ठाकरे काही वेळापूर्वी यांनी आढावा बैठक घेतली.
⚡ पत्राचाळ घोटाळ्यात राऊतांची पडद्याआड भूमिका :
मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने खासदार संजय राऊत यांच्याविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. या पुनर्विकासाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात संजय राऊत यांचा केवळ सहभाग नसून त्यांनी पडद्याआड राहून काम केल्याचे पुरावे सापडल्याचे ईडीने या आरोपपत्रात नमूद केले. राऊत हे एक राजकीय व्यक्तिमत्त्व असल्याने बाहेर येताच ते पुराव्यांशी छेडछाड करू शकतात, त्यामुळे तपास महत्त्वाच्या टप्प्यावर असताना त्यांना जामीन देणे योग्य ठरणार नाही, असा युक्तिवादही ईडीने यापूर्वी केला होता.
🏏 ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेआधी भारताला मोठा धक्का :
20 सप्टेंबरपासून मोहाली येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाची तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरू होणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघातून एक महत्त्वाचा खेळाडू बाहेर झाला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला करोना विषाणूचा संसर्ग झाल्याने तो आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत खेळू शकणार नाही. मागील अनेक दिवसांपासून तो संघाबाहेर होता. पण आता करोना संसर्ग झाल्याने त्याचं पुनरागमन पुन्हा एकदा लांबणीवर पडलं आहे.
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Latur Saptrang ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786
No comments:
Post a Comment