शेतकऱ्याने अंगावर ओतले पेट्रोल
बीड : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ध्वजवंदनाचा कार्यक्रम सुरू असतानाच एका शेतकऱ्याने पेट्रोल अंगावर ओतून घेतले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत या व्यक्तीला ताब्यात घेतले. सुरेश शिवाजी उपाडे (वय ३२, रा. रेवली, ता. परळी) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे.
सुरेश उपाडे यांना दोन चुलते असून एका चुलत्याच्या निधनानंतर दुसऱ्याने तीनऐवजी दोनच वारसदार दाखवून वडिलोपार्जित संपत्तीतून बेदखल केल्याचा सुरेश उपाडे यांचा आरोप आहे. जमिनीच्या तीन वाटण्या समान हिस्स्यात कराव्या, यासाठी तलाठी व तहसील कार्यालयात खेटे मारूनही न्याय मिळाला नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
ध्वजवंदन सुरू असतानाच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सुरेश उपाडे हातात पेट्रोलची कॅन घेऊन आले. पेट्रोल अंगावर ओतत असतानाच शिवाजीनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक केतन राठोड, गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार तसेच सिरसाळा ठाण्याचे अंमलदार तुषार गायकवाड, आशुतोष नाईकवाडे यांनी त्यांना ताब्यात घेतले. कॅन व काडीपेटी हिसकावून घेतली. त्यानंतर त्यांना पुढील कारवाईसाठी शिवाजीनगर ठाण्यात नेले. तलाठी व तहसीलदाराने बोगस फेरफार केला असून तो रद्द करण्यात यावा अशी मागणी या शेतकऱ्याने केली.
No comments:
Post a Comment