सकाळच्या टॉप घडामोडी : 4 ऑक्टोबर 2022 - latur saptrang

Breaking

Tuesday, October 4, 2022

सकाळच्या टॉप घडामोडी : 4 ऑक्टोबर 2022

 सकाळच्या टॉप घडामोडी : 4 ऑक्टोबर 2022



▪️ पहिल्या स्वदेशी लढाऊ हेलिकॉप्टरचे नाव 'प्रचंड': 22 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर हवाई दलात दाखल; संरक्षणमंत्र्यांनीही घेतले त्यात उड्डाण


▪️ काँग्रेस अध्यक्षपद निवडणूक: ​​खरगे म्हणाले- थरूर भावाप्रमाणे असून ही निवडणूक कौटुंबिक; थरूर म्हणाले- उमेदवारांत चर्चा झाली पाहिजे


▪️ मुलायमसिंह यादव यांचे पहिले हेल्थ बुलेटिन जारी: 24 तासांपासून CCUमध्ये दाखल, केंद्रीय मंत्री बघेल पोहोचले मेदांता रुग्णालयात


▪️ नोबेल 2022: वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक स्वीडनच्या स्वांते पाबो यांना जाहीर, मानव विकासावर संशोधन


▪️ नार्वेकर शिंदे गटात जाणार का?: उद्धव ठाकरेंच्या संकटमोचकाकडून अखेर चर्चेला पूर्णविराम; शिवतीर्थ ते बंगाली दुर्गोत्सवाला भेट!


▪️ दसरा मेळाव्यात मर्यादा ओलांडू नका: शरद पवारांचा ठाकरे, शिंदे गटाला सल्ला; राज्याच्या प्रमुखांवर जबाबदारी अधिक


▪️ भाजप नेत्यांना निमंत्रण नाही: दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे स्वबळ आजमावणार; तर शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेस रिंगणात


▪️ नारायण राणेंचे उद्धव ठाकरेंबद्दल महत्वाचे विधान: म्हणाले- ठाकरेंनी दसरा मेळाव्याला बोलावल्यास जाईल; पण ते निमंत्रण देणार नाहीत


▪️ प्रसिद्ध गायक आनंद शिंदेंचा इशारा: राज्यपाल नियुक्त 12 आमदारांत मला डावलू नका; पहिल्या यादीचाच विचार करावा लागेल, अन्यथा मी केस करेल


▪️ महिला आशिया कप स्पर्धेत भारताचा दुसरा विजय: डकवर्थ लुईस पद्धतीने मलेशियावर 30 धावांनी विजय; शेफाली-मेघनाची 116 धावांची खेळी


▪️ विराटला तिसऱ्या T-20 मधून विश्रांती: टीम इंडियाने जिंकली आहे सिरीज, आज इंदूरमध्ये द.आफ्रिकेविरुद्ध शेवटचा सामना


No comments:

Post a Comment