उदगीर लोहार्याजवळ भीषण अपघात 5 ठार तर...
Latur Accident : लातूर (Latur) उदगीर रस्त्यावरील लोहारा गावाजवळ एस टी बस (ST Bus) आणि स्वीफ्ट डिझायर कारची भीषण धडक झाली. यात एका कारमधील पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी आहे.
देवदर्शनासाठी तुळजापूरला गेले होते
उदगीर येथील एका बाल रुग्णालयातील एकूण पाच कर्मचारी त्यात तीन महिला आणि दोन पुरुष हे देवदर्शनासाठी तुळजापूरला गेले होती. देवदर्शन करून परत येताना हा अपघात झाला. या अपघातात वाहन चालक आणि इतर दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तर दोघांचा दवाखान्यात नेत असताना रस्त्यात मृत्यू झाला. देवदर्शनासाठी गेलेल्या पाचही जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे.
कारचा चक्काचूर
उदगीर चाकुर येथे जाणारी ही एसटी बस उदगीर आगाराची असून गाडीचे चाक तुटून पडले होते. तर कारचा चक्काचूर झाल्याचे पाहायला मिळाले. यावरून अपघात किती भीषण होता याचा अंदाज बांधता येतो. मिळालेल्या माहितीनुसार, कार मधील प्रवासी हे तुळजापूर येथून दर्शन घेऊन येत होते अशी माहिती आहे. त्यावेळी हा भीषण अपघात झाल्याचं पाहायला मिळालं. अपघातात मृत पावलेल्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी उदगीरच्या सरकारी दवाखान्यात हलवण्यात आले आहेत. तर अपघातातील गंभीर जखमींना तात्काळ लातूर येथे हलविण्यात आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. तर एस टी बस मधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. बस चालकाने बस बाजूला नेण्याचा प्रयत्न केल्यानंतर ही धडक झाली आहे. यात कार चक्काचूर झाली आहे. तर बसचे चालकाच्या बाजूचे टायर बाजूला निघून पडले आहे. यावेळी बस चालकाने लावलेल्या ब्रेकमुळे बस मधील प्रवाशांना मार बसला आहे
मृतांची नावे
1)अलोक तानाजी खेडकर (रा. संत कबीर नगर, उदगीर (मयत))
2)अमोल जीवनराव देवक्तते (रा. रावनकोला (मयत))
3)कोमल व्यंकट कोदरे (रा. दोरणाळ ता मुखेड (मयत))
4)यशोमती जयवंत देशमुख (रा. यवतमाळ (मयत))
5)नागेश ज्ञानेश्वर गुंडेवार (रा. बिदर रोड, उदगीर (मयत))
6)प्रियांका गजानन बनसोडे (रा. एरोळ ह मु गोपाळ नगर,उदगीर (जखमी))
No comments:
Post a Comment