दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी - latur saptrang

Breaking

Tuesday, October 4, 2022

दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी

  दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी




💥 तुळजापूरला दर्शनासाठी जाताना काळाची झडप :


लातूर-उदगीर रस्त्यावर हैबतपूर पेट्रोल पंपाजवळ कार व एसटी महामंडळाच्या बसची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला आहे. अपघातात कारमधील पाच जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. उदगीर येथून कुटुंब कारने सकाळी 8.30 च्या सुमारास निघालं होतं. कारमधून सहा जण तुळजापुरला दर्शनासाठी निघाले होते. लातूर- उदगीर रस्त्यावर हैबतपुर जवळील पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर कुत्र्यांना वाचवताना चालवकाने कार वळवली आणि त्याचवेळी समोरून येणाऱ्या एसटी बसवर जाऊन धडकली.



⚖️ धनुष्यबाण चिन्हासाठी ठाकरे-शिंदे गटाला 7 ऑक्टोबरपर्यंत :


शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह कोणाचं याचा फैसला आता निवडणूक आयोग करणार आहे. यासाठी निवडणूक आयोगात दोन्ही बाजूंना 7 ऑक्टोबरपर्यंत कागदपत्रं सादर करावी लागणार आहेत. कोर्टाच्या आदेशानंतरच आयोगाने शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाला 7 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणूकही जाहीर झाल्याने या दरम्यान धनुष्यबाण या चिन्हाचा फैसला होऊ शकणार का? याची उत्सुकता लागली आहे. 


🚨 मोठी बातमी! संजय राऊतांचा दसरा तुरुंगातच :


पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांना दसराही तुरुंगातच घालवावा लागणार आहे. संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत 10 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. १० ऑक्टोबरलाच त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे. गटप्रमुखांच्या मेळाव्यात संजय राऊत अनुपस्थित असल्याने त्यांचं नाव असलेली खुर्ची रिकामी ठेवली होती. दसरा मेळाव्याच्या आधी संजय राऊत बाहेर येतील आणि तोफ धडाडेल अशी शिवसैनिकांनी अपेक्षा होती. पण तसे झाले नाही.


🗣️ शिंदे सरकार अशोक चव्हाणांवर मेहेरबान आहे का? :


एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकारनं घेतलेले निर्णय रद्द केले आहेत. काही निर्णयांना स्थगिती दिली आहे.  मात्र अशोक चव्हणांच्या  मतदारसंघातील वॉटर ग्रीड योजना मंजूर झाली असून त्याचे टेंडरही निघावे आहेत,  त्यामुळे शिंदे सरकार अशोक चव्हाणांवर  मेहेरबान आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.  




🏏 विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर बुमराह भावूक :


टीम इंडियाला मोठा झटका बसला असून संघाचा मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे विश्वचषकातूनबाहेर झाला आहे. बुमराह विश्वचषकाला मुकणार याबाबत बीसीसीआयनं अधिकृतरित्या जाहीर केलं. ज्यानंतर आता स्वत: बुमराहनेही आपली प्रतिक्रिया ट्वीट करत दिली आहे. ट्वीटमध्ये त्याने भावनिक संदेश लिहित, विश्वचषकातून बाहेर पडावं लागल्याचं फार दु:ख झालं आहे, असंही म्हटलं आहे.

No comments:

Post a Comment