राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राची वार्षिक बैठक संपन्न - latur saptrang

Breaking

Tuesday, October 4, 2022

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राची वार्षिक बैठक संपन्न

मुंबई, दि. 4 : नागपूर येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या कार्यकारी व शासक मंडळाची वार्षिक बैठक केंद्राचे पदसिद्ध अध्यक्ष तथा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली राजभवन मुंबई येथे पार पडली.

बैठकीला केंद्राचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर, शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचे अधिकारी तसेच मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा व कर्नाटक राज्यातील सांस्कृतिक केंद्राचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीत केंद्राच्या वार्षिक लेख्यांना तसेच खर्चाला मान्यता देण्यात आली तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या वेळापत्रकाला मंजुरी देण्यात आली. यावेळी केंद्राच्या अधिपत्याखालील राज्यांमध्ये सांस्कृतिक कार्याला चालना देण्याबाबत चर्चा करण्यात आली.

Governor Koshyari presides over Annual Meeting of South Central Zonal Cultural Centre

Mumbai Dated 4 : The Annual Meeting of the Executive Board and Governing Body of the South Central Zonal Cultural Centre Nagpur (SCZCC) was held under the Chairmanship of Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan Mumbai.

Director of SCZCC Dr Deepak Khirwadkar, Secretary of Tourism and Culture Saurabh Vijay, officials of Ministry of Culture and Members and officials of the Centre from the States of Chhattisgarh, Madhya Pradesh, Karnataka, Telangana and Andhra Pradesh were present.

The Meeting approved the Annual Accounts and Budget of the Centre and endorsed the Programme Calendar of the Centre. Issues relating to promotion of cultural programmes in the States under the aegis of South Central Zone were also discussed.

0000



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/bDkw9fy
https://ift.tt/8KT74WZ

No comments:

Post a Comment