5G Launch: 5G सेवेमुळे अशी बदलणार इंटरनेटची दुनिया, फास्ट स्पीडसह 'या' क्षेत्रात देखील महत्वाची भूमिका
5G म्हणजे काय ? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तसेच, 5G च्या लॉंचिंगनंतर नक्की कोणते बदल पाहायला मिळतील ? डेटा प्लान्स आल्यानंतर महाग होतील का? सामान्य ग्राहकांना 5G सेवा कधी मिळणे सुरू होईल जाणून घ्या सविस्तर.
5G India: अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 5G सर्विस लाँच करण्यात आली असून PM Modi यांनी 5G च्या स्वरूपात भारतीयांना डिजिटल भेट दिली आहे. 'इंडिया मोबाइल काँग्रेस-2022' च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदी 5G तंत्रज्ञान लाँच केले. 5G सर्विस आल्यानंतर आता युजर्सना अनेक बदल अनुभवायला मिळतील. सोबतच 5G Network सोबत cloud gaming, AR/VR technology आणि IoT मध्ये सुद्धा भन्नाट वेग पाहायला मिळेल . देशात कुठेही 5G यशस्वीपणे वापरण्याची ही पहिलीच वेळ आहे. पण,अशा परिस्थितीत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की 5G म्हणजे काय ? या स्पेक्ट्रम लिलावात कोणाला काय मिळाले? 5G च्या आगमनाने काय फरक पडेल? डेटा प्लान आल्यानंतर महाग होतील का? सामान्य ग्राहकांना 5G सेवा कधी मिळणे सुरू होईल आणि सर्वात महत्वाचे 5G स्पीड व्यतिरिक्त इतर कोणत्या सुविधा उपलब्ध असतील. पाहा डिटेल्स.
5G Network
5G म्हणजे काय? सोप्या शब्दात सांगायचे तर 5G हे सर्वात आधुनिक स्तराचे नेटवर्क आहे, ज्या अंतर्गत इंटरनेटचा वेग सर्वात वेगवान असेल. यात अधिक विश्वासार्हता असेल आणि पूर्वीपेक्षा जास्त नेटवर्क हाताळण्याची क्षमता असेल. याशिवाय, त्याच्या उपस्थितीचे क्षेत्र अधिक असेल आणि अनुभव देखील युजर फ्रेंडली असेल. 5G ची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते लोअर फ्रिक्वेन्सी बँडपासून ते हाय बँडपर्यंतच्या लहरींमध्ये काम करेल. म्हणजेच, 5G चे नेटवर्क अधिक विस्तृत आणि High Spped असेल.
5G Speed
डेटा प्लॅन आल्यानंतर महाग होतील का? युजर्ससाठी सर्वात मोठा प्रश्न 5G इंटरनेटसाठी द्यावा लागणारा खर्च आहे. येथे लक्षात घेण्यसासारखी गोष्ट म्हणजे,आधी ज्या देशांमध्ये 5G मध्ये सेवा सुरू करण्यात आली. त्या देशांमध्ये 4G आणि 5G च्या किमतीतील तफावत पाहिल्यास, अमेरिकेत, जिथे 4G अमर्यादित सेवांसाठी $६८ (सुमारे पाच हजार रुपये) पर्यंत खर्च करावे लागले, असे समोर आले आहे. तर 5G मध्ये हा फरक $८९ (सुमारे ६५०० रुपये) इतका वाढला आहे. हा फरक वेगवेगळ्या प्लान्सनुसार बदलतो. 5G प्लान्स 4G पेक्षा १० ते ३० टक्के जास्त महाग आहेत.
5G Benefit Areas
5G स्पीड व्यतिरिक्त इतर कोणत्या सुविधा उपलब्ध असतील ?5G लाँच केल्यामुळे, जीवन, व्यवसाय आणि कार्यपद्धती मोठ्या प्रमाणात बदलेल अंदाज बांधला जात आहे. 5G ची प्रगत तंत्रज्ञान आणि उच्च क्षमता सर्वकाही कनेक्ट करेल - घर, ड्रायव्हरलेस कार, स्मार्ट ऑफिस, स्मार्ट सिटी आणि प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता. अनेक मार्गांनी, 5G नेटवर्क सर्व चांगले आणि अशक्य बदल घडवून आणण्यात मदत करेल . 5G तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात, विशेषतः रुग्णालये, विमानतळ आणि डेटा संकलनात मोठी भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे. वायरलेस तंत्रज्ञानाची पुढील पिढी केवळ फोनपुरती मर्यादित राहणार नाही.
5G Frequency
5G टॉवर: 5G चे एक खास वैशिष्ट्य म्हणजे ते त्याच रेडिओ फ्रिक्वेन्सीचा वापर करेल ज्यावर सध्याचा मोबाइल डेटा, वाय-फाय आणि सॅटेलाइट कम्युनिकेशन चालू आहे. म्हणजेच, टेलिकॉम कंपन्या 5G नेटवर्कसाठी तुमच्या शेजारी कोणतेही अतिरिक्त टॉवर्स बसवणार नाहीत. भारतातील डेटाची किंमत गेल्या काही वर्षांमध्ये सर्वात कमी आहे. यावर्षी मार्चमध्ये एअरटेलचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO) रणदीप सेखोन यांनी सांगितले होते की, 5G प्लान्सच्या किमती 4G च्या आसपास ठेवल्या जातील. मोबाईल कंपनी नोकिया इंडियाचे सीटीओ रणदीप रैना यांनीही एका मुलाखतीत सांगितले की, भारतात 5G च्या लवकर रोलआउटसाठी प्लान्सच्या किमती कमी ठेवल्या जातील. किमतीबद्दल अद्याप अचूक माहिती उपलब्ध नाही .
No comments:
Post a Comment