वीज अंगावर पडून ३ ऊसतोड कामगारांचा जागीच मृत्यू - latur saptrang

Breaking

Wednesday, October 19, 2022

वीज अंगावर पडून ३ ऊसतोड कामगारांचा जागीच मृत्यू

 



नांदेड :
 जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील धावरी येथे आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास ऊस तोडणीचे काम सुरू असताना ऊसतोड कामगारांच्या अंगावर वीज पडून तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर एक १७ वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली आहे. जखमीस उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

गेल्या आठ दिवसापासून लोहा तालुक्यासह परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. आज दुपारी देखील विजेच्या कडकडाटसह पावसाला सुरुवात झाली. यात धावरी येथील ऊसतोड कामगार काम करत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली. या घटनेत तीन जण जागीच ठार झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच लोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे पोलीस कॉन्स्टेबल अशोक केंद्रे ,सचिन गिरे यांनी शेतात जाऊन घटनेचा पंचनामा केला. घटनास्थळी तहसीलदार, नायब तहसीलदारांनी भेट दिली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

    १)माधव पिराजी डुबुकवाड (वय ४५) रा. पानभोसी ता. कंधार

२)पोचीराम श्यामराव गायकवाड (वय ४६) रा. पेठ पिंपळगाव ता. पालम जि .परभणी
३) रुपाली पोचीराम गायकवाड (वय १०) रा. पेठ पिंपळगाव या चिमुकलीचा मृतकामध्ये समावेश आहे.

No comments:

Post a Comment