बसवंतपुर भांबरी चौकात मनसेचा*
*एक तास रास्ता रोको,,,,,
बसवंतपुर भांबरी येथील मुख्य रस्ता तात्काळ दुरुस्त करावा तसेच गावातील मूलभूत सुविधा वीज लाईट पाणी या सर्व बाबींचे मागणीसाठी मनसे राज्य सरचिटणीस संतोष नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली भव्य असा रास्ता रोको करण्यात आला गावात जाणारा मुख्य रस्ता अत्यंत खराब झाला असून त्या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत पावसात त्या खड्ड्यात तळ्यात पाणी साचल्यासारखी अवस्था होते खराब रस्त्यामुळे अनेक वेळा त्या रस्त्यावर अपघात झालेले आहेत प्रसंगी काही लोकांचा त्या रस्त्यावर जीवही गेलेला आहे त्या गावातील लोक रस्त्याने ये जा करताना आपला जीव मुठीत घेऊन जातात प्रशासनाला गावातील लोकांनी अनेक वेळा रस्ता दुरुस्त करा असे सांगितले असता जनतेच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे हा रस्ता गेली पंधरा वर्षापासून याच खराब अवस्थेत आहे तसेच या गावात मोठमोठे गोडाऊन असल्यामुळे अवजड वाहनांची वाहतूक सातत्याने होत असते या भागातील व्यापारी वर्ग सुद्धा या खराब रस्त्यामुळे त्रस्त आहेत त्यामुळे व्यापारी वर्गाच्या व्यवसायावर परिणाम झालेला आहे तसेच लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी या रस्त्याने कसरत करावी लागत आहे वृद्ध व्यक्तींना तर या रस्त्यावर चालता सुद्धा येत नाही हे गाव लातूर शहर मतदार संघात असून लातूर शहराच्या एवढ्या जवळ असलेले गाव असून सुद्धा या गावाची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे तसेच गावात सार्वजनिक ठिकाणी लाईटची व्यवस्था नाही पावसाळ्याच्या दिवसात सुद्धा या गावातील लोकांना पाणी विकत घ्यावे लागते ही अत्यंत गंभीर बाब आहे गावाच्या अंतर्गत सुद्धा रस्ते अत्यंत खराब झालेले आहेत या भागात सर्वसामान्य लोक राहत असून त्यांच्याकडे प्रशासनाचे व येथील ग्रामपंचायतचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे गावात गोरगरीब जनतेला राशन कार्ड नाहीत ज्येष्ठ नागरिकांना पगारी नाहीत गोरगरिबांना घरकुल नाहीत या गावातील लोक अत्यंत दयनीय अवस्थेत जीवन जगत आहेत मात्र याउलट या गावातील लोकांना कुठलीही सुविधा न देता ग्रामपंचायतीचा कर मात्र नियमित भरून घेतला जातो वरील सर्व बाबींच्या तक्रारीची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दखल घेऊन रास्ता रोको आंदोलन केले गावातील तरुण वृद्ध महिला व शाळेतील विद्यार्थी मनसेच्या रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते वरील गावच्या लोकांची मागणी मान्य नाही झाल्यास या नंतर मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल असा इशारा मनसे सरचिटणीस संतोष नागरगोजे यांनी दिला आंदोलनाच्या शेवटी जिल्हा परिषदेचे अधिकारी जाधव साहेब यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना व गावकऱ्यांना रस्ता करण्याचे लेखी आश्वासन दिले भांबरी चौक येथे मनसेच्या वतीने राष्ट्रीय मार्ग क्रमांक 236 ते भांबरी चौक या रस्त्याचे डांबरीकरण एक तारखेला सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिल्या नंतरच मनसे आणि गावकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले या आंदोलनाच्या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे राज्य उपाध्यक्ष भागवत शिंदे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अंकुश शिंदे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष किरण किरण चव्हाण शहराध्यक्ष मनोज अभंगे जिल्हा सचिव रवी सूर्यवंशी सचिन शिरसाट प्रीती भगत मारुती लोहोकरे कृष्णा सारगे अमर दांडगे अमित काळुंखे विशाल बंडे महेश पिसाटे राहुल तरोडे सदाशिव सातपुते तसेच गावातील अनेक तरुण ज्येष्ठ नागरिक महिला व बालवर्ग या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित होता
No comments:
Post a Comment