राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या हस्ते डॉ.राजेश दरडे यांना सन्मानीत - latur saptrang

Breaking

Sunday, October 16, 2022

राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या हस्ते डॉ.राजेश दरडे यांना सन्मानीत



राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या हस्ते डॉ.राजेश दरडे यांना सन्मानीत

 लातूर ः वैवाहीक जीवन जगत असतांना स्त्री आणि पुरूष हे दोन घटक मुख्य मानले जातात. या दोघांच्या संबंधातूनच जन्माला येते ती नवी कळी. परंतू कांही स्त्री-पुरूषांना मुला-बाळांचे सुख प्राप्त होवू शकत नसते अशांसाठी आशेचा किरण म्हणून आज समाजामाध्ये काही डॉक्टर्स उपलब्ध झाले आहेत. अशाच डॉक्टरांचा उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या प्रसुती आणि स्त्रीरोगतज्ञ संघटनेच्यावतीने नुकतेच मुंबईच्या राजभवनामध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात मान्यवर डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लातूर येथील वैष्णवी एन्डोस्कोपीचे प्रसिध्द डॉ.राजेश वैजनाथराव दरडे यांना राज्यपाल भगतसिंह कोशयारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

डॉ.राजेश दरडे यांचे मुखेड तालुक्यातील दापका गुंडोपंत हे मुळ गाव आहे. आपल्याला शुन्यातून विश्‍व निर्माण करायचे असेल तर त्या पध्दतीने मेहनत ही करावीच लागते. याच मेहनतीच्या जोरावर डॉ.राजेश दरडे यांनी डॉक्टरी क्षेत्रातील सर्वोच्च पदव्या घेवून हे शिखर गाठले आहे. डॉक्टर म्हटले की पैशाचा खेळ हा आलाच परंतू पैसे कितीही लागू द्या शिकणारा माणूस असला की तो शिकतोच अशाच प्रकारचे डॉक्टरकीचे शिक्षण देश-विदेशातून घेवून त्यांनी लातूरसारख्या ठिकाणी डॉक्टरी क्षेत्रात दर्जेदार सुविधा देण्याचे काम मागील अनेक वर्षापासून करत आहेत. गोरगरीब रूग्णांच्या अडीअडचणी जाणून घेवून त्यांना आधार देवून त्यांच्या परिस्थितीचे भान ठेवून ते त्या रूग्णांवर योग्य उपचार करण्याचे काम करतात. गरीबीची जाणीव असणाराच व्यक्ती हे सर्व कांही करू शकतो. त्यांनी आजपर्यंत वैष्णवी एन्डोस्कोपीच्या माध्यमातून ज्या माता-पित्यांना मुले-बाळे होण्यास अडचणी येत होत्या अशांचा अडचणी जाणून घेवून त्यांच्या जीवनात कळी फुलविण्याचे काम त्यांनी केलेले आहे. अशा 10 हजारापेक्षा जास्त कुटूंबांना त्यांनी सुखी आणि आनंदी जीवन जगण्यासाठीची प्रेरणा दिली आहे. आज लाखो विद्यार्थी डॉक्टरीचे शिक्षण घेताना पहायला मिळतात अशा नवीन डॉक्टरांनी डॉ.राजेश दरडे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अथक परिश्रम घेवून आपले शिक्षण पुर्णत्वास नेले पाहिजे. व समाजासाठी आरोग्याच्या क्षेत्रात एक आदर्शकारक काम करायलाच हवे!
मुंबई येथील राजभवनावर प्रसुती आणि स्त्रीरोगतज्ञ संघटनेच्यावतीने हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रसुती आणि स्त्रीरोगतज्ञ संघटनेचे सन 2020-2022 च्या अध्यक्षा डॉ.नंदिता पालशेतकर व वर्ष 2022-24 चे नवनियुक्त अध्यक्ष डॉ.राजेंद्रसिंह परदेशी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या पार पडलेल्या कार्यक्रमात डॉ.राजेश वैजनाथराव दरडे यांच्यासह एकूण 37 डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. वंध्यत्व आणि स्त्रीरोग निवारण क्षेत्रात डॉ.राजेश दरडे यांचे उल्लेखनीय कार्य असून आजपर्यंत हजारो निःसंतान दाम्पत्याच्या चेहर्‍यावर हास्य आणण्याचे काम डॉ.दरडे हे मागील अनेक काळापासून करत आहेत. मुंबई-पुण्यात ज्या सुविधा मिळतात त्याच सुविधा आत्याधुनिक पध्दतीने देण्याचे काम लातूर येथे मागील अनेक वर्षापासून ते करत आहेत. कमीत कमी पैशात रूग्णांना चांगल्या सेवा पुरविण्याचे काम डॉ.राजेश दरडे देत आहेत. याचाच दाखला घेवून त्यांचा राजभवनावरती मान्यवर डॉक्टरांच्या उपस्थिती सत्कार व सन्मान करण्यात आला. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment