लातूर : मांजरा नदीकाठी असणाऱ्या ग्रामस्थांना पाटबंधारे विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मांजरा धरण भरत आले असून या धरणातून कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो. त्यामुळे ग्रामस्थांनी सुरक्षित ठिकाणी जावे तसेच जनावरांनाही सुरक्षित ठिकाणी हलवावे, असं आवाहन पाटबंधारे विभागाने केलं आहे.
गेल्या दोन चार दिवसापासून जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोर धरला आहे. लातूरची तहान भागविणाऱ्या मांजरा धरणामध्ये सध्य स्थितीत ९२ टक्के पाण्याचा साठा झाला आहे. धरण भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणात पाण्याचा येवा सुरुच आहे. परिणामी धरण केव्हाही भरु शकते. परिस्थिती लक्षात घेऊन धरणातून कोणत्याही क्षणाला पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो. त्यामुळे मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
लातूर, उस्मानाबाद, बीड या तीन जिल्ह्यातल्या अनेक गावांना मांजरा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या धरण परिक्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण भरण्याच्या स्थितीत असल्याने उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. या पाण्यामुळे यंदा मांजरा पट्टा हिरवा राहण्यास मदत होणार आहे. मांजरा पट्ट्यातील शेतकऱ्यांना या धरणातील पाण्याचा मोठा फायदा हात असतो. सलग तीन वर्षे हे धरण भरत आलेलं आहे. मात्र, यावेळी हे धरण भरेल की नाही अशी चिंता शेतकऱ्यांना होती. धरण भागात पाऊस पडत नसल्याने पाणी साठा कमी होत चालला होता. १०० टक्के धरण भरावे असे या भागातील शेतकऱ्यांना वाटत होते. आता परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरण भारत आले आहे त्यामुळे शेतकरी सुखावला आहे.
No comments:
Post a Comment