ढगफुटी सदृश्य पावसाने पिकाचे नुकसान आ रमेशआप्पा कराड यांची पहाणी करून पंचनामे करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना - latur saptrang

Breaking

Saturday, October 15, 2022

ढगफुटी सदृश्य पावसाने पिकाचे नुकसान आ रमेशआप्पा कराड यांची पहाणी करून पंचनामे करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना



 ढगफुटी सदृश्य पावसाने पिकाचे नुकसान आ रमेशआप्पा कराड यांची पहाणी करून पंचनामे करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

        रेणापुर तालुक्यातील काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून यामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे नुकसानग्रस्त शेतीची तात्काळ पाहणी करून पंचनामे करावेत अशा सूचना भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांनी अधिकाऱ्यांना दिल्या असून शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती 72 तासाच्या आत विमा कंपनीला ऑनलाईन द्यावी असे आवाहन केले

        रेणापूर तालुक्यातील आसराचीवाडी, रामवाडी (ख), तळणी, मोहगाव, कुंभारवाडी, चुकरवाडी, मुरढव, पाथरवाडी, भंडारवाडी, घनसरगाव, खरोळा यासह अनेक गावच्या परिसरात आज शुक्रवारी मेघगर्जनेसह ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे काढणीस आलेल्या सोयाबीनसह शेतीतील उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वीज पडून आसराची वाडी येथे पाच शेळ्या आणि रामवाडी ख येथे एक म्हैस दगावली. सखल भागात पाणी साचल्याने काही शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत या पावसामुळे ओढे नाल्यांना पूर आल्याने काही काळ त्या त्या भागातील वाहतूक बंद होती.

           सदरील ढगफुटी सदृश्य पावसाची माहिती समजतात भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांनी नुकसानग्रस्त भागाची तात्काळ पाहणी करून पंचनामे करावेत अशा सूचना महसूल विभागासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

        रेणापूर तालुक्यासह जिल्ह्यात सर्व दूर पाऊस होत असून खरीप पिकाची काढणी सुरू असल्याने या अवकाळी पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले असून नुकसानीत आलेल्या शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत नुकसानीची माहिती क्रॉप इन्शुरन्स कंपनीला मोबाईल ॲपद्वारे द्यावी त्याचबरोबर तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे नुकसानीची माहिती कळवावी असेही आव्हान भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांनी केले आहे

No comments:

Post a Comment