अतिवृष्टीमुळे दुरावस्था झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी– छगन भुजबळ - latur saptrang

Breaking

Saturday, October 1, 2022

अतिवृष्टीमुळे दुरावस्था झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी– छगन भुजबळ

chagan bhujbal


 येवला मतदारसंघातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विकासकामांचा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आढावा


येवला मतदारसंघातील प्रलंबित कामे पूर्ण करत नवीन कामांचे प्रस्ताव तातडीने सादर करा – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ


अतिवृष्टीमुळे दुरावस्था झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी– छगन भुजबळ 


नाशिक,दि.१ ऑक्टोबर :- येवला मतदारसंघातील आमदार स्थानिक विकास कार्यक्रम, मुलभूत सुविधा, रस्त्यांची सुधारणा, येवला नगरपरिषद परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाची तसेच मतदारसंघातील सर्व रस्ते, शासकीय कार्यालय, शासकीय निवासस्थाने यासह विविध विकास कामांचा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आढावा घेतला. यातील प्रलंबित सर्व कामे तातडीने पूर्ण करून नवीन कामांचे प्रस्ताव शासनास सादर करण्यात यावे अशा सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.


माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिक येथील संपर्क कार्यालयात येवला मतदारसंघातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रलंबित कामांचा सबंधित अधिकाऱ्यांसमवेत आढावा घेतला. यावेळी या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही.बी.पाटील, कार्यकारी अभियंता उदय पालवे, येवला नगर पालिकेचे मुख्याधिकारी नागेंद्र मुत्केकर, उपविभागीय अभियंता अर्जुन गोसावी, अविनाश देवरे, उमेश पाटील, सागर चौधरी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.


यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आमदार स्थानिक विकास कार्यक्रम, मुलभूत सुविधा योजना, रस्त्यांची सुधारणा, जिल्हा नियोजन मंजूर कामे, प्रादेशिक पर्यटन योजनेतील कामे, अर्थसंकल्पातील मंजूर कामे, शासकीय अधिकारी निवासस्थाने, तालुका क्रीडा संकुल, हायब्रीड अॅन्युटी कामे, लासलगाव बाह्य वळण रस्ता, लासलगाव विंचूर चौपदरीकरण यासह विविध विकास कामांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.


यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मतदारसंघात सुरु असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत. अतिवृष्टीमुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याने या सर्व रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी. मंजूर असलेल्या कामांची निविदा प्रक्रिया जलद गतीने करण्यात यावी अशा सूचना करत विकासाच्या कामांमध्ये कुठलीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही असा इशारा संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.


यावेळी ते म्हणाले की, येवला नाशिक रस्त्यावर खड्डे पडल्याने अतिशय दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजविण्यात येऊन दुभाजक स्वच्छता व दुरुस्ती करण्यात यावी. लासलगाव विंचूर या रस्त्याच्या चौपदरीकरण कामाचा प्रस्ताव हायब्रीड अॅन्युटी अंतर्गत सादर करण्यात यावा. येवला विंचूर चौफुली येथे सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी. तसेच अंगणगाव गोदाम, शासकीय अधिकारी निवासस्थाने, येवला मुक्तीभूमीसह सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.




No comments:

Post a Comment