दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी - latur saptrang

Breaking

Saturday, October 1, 2022

दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी

  दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी


modi


🌐 भारतात आजपासून 5G चा शुभारंभ :


देशात आज 5G इंटरनेट सुविधेला सुरुवात होत आहे. सुरुवातीला देशातील 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु करण्यात येणार आहे. दिवाळीपर्यंत या 13 शहरांमध्ये 5G इंटरनेट सेवा सुरु होईल. त्यानंतर हळूहळू 5G इंटरनेट सेवेचं जाळं देशभर विस्तारत जाईल. मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, चंदीगड, गुरुग्राम, हैदराबाद, लखनौ, गांधीनगर, अहमदाबाद आणि जामनगर या 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु होणार आहे.


🚫 पाकिस्तान सरकारच्या ट्विटर अकाउंटवर भारतात बंदी :


पाकिस्तान सरकारचं ट्विटर अकाउंट भारतात बंद करण्यात आलं आहे. हे ट्विटर अकाउंट भारतीय ट्विटर युजर्ससाठी ब्लॉक करण्यात आलं आहे. अनेक तक्रारी आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचं ट्विटरकडून सांगण्यात आलं आहे. अलिकडेच सरकारच्या ट्विटर अकाउंटवरून पीएफआय (PFI) बंदीच्या विरोधात ट्वीट करण्यात आलं होतं. त्यामुळेच ही कारवाई झाल्याची माहिती मिळत आहे. 


🗣️ नार्वेकर शिंदे गटात सहभागी होतील; गुलाबराव पाटलांचा दावा :


आता उद्धव ठाकरेंचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकर शिंदे गटात सहभागी होतील, असा दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गणेशोत्सवाच्या काळात मिलिंद नार्वेकरांच्या घरी जात त्यांची भेट घेतली होती. शिवसेनेतून बाहेर पडले असले, तरी शिंदेंनी नार्वेकरांसोबत संवाद कायम राखला आहे.


😇 छगन भुजबळांनी दिली जीवे मारण्याची धमकी :


माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्याविरोधात जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेंबूर येथील व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते ललित कुमार टेकचंदानी यांनी भुजबळांविरोधात चेंबूर पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार, टेकचंदानी यांनी भुजबळांच्या मोबाईलवर दोन व्हिडिओ पाठवले होते. यात आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या, असा आरोप टेकचंदानी यांनी केला.


🏏 बाबर आझमने रचला इतिहास :


पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमने इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात इतिहास रचला असून एका मोठ्या विक्रमाची बरोबरी केली. बाबरने असा विक्रम केला आहे, जो आतापर्यंत कोणताही पाकिस्तानी क्रिकेटर करू शकलेला नाही. बाबर आझम हा माजी भारतीय कर्णधार विराट कोहली आणि सध्याचा कर्णधार रोहित शर्मा यांच्या खास क्लबमध्ये सामील झाला. त्याने आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ३ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. 



No comments:

Post a Comment