फुले शाहू आंबेडकर यांनी या देशात समाजक्रांती तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्य क्रांती घडवली - छगन भुजबळ
शाळेत महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन झालेच पाहिजे - छगन भुजबळ
जागतिक कर्णबधिर दिनानिमित्त छगन भुजबळ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वैश्विक ओळखपत्रे वाटप आणि ऑडियोमेट्रिक रूमचे उद्घाटन
सामाजिक कार्य करणाऱ्यांच्या पाठीशी आम्ही नेहमीच उभे राहू
येवला, ३० सप्टेंबर
फुले शाहू आंबेडकर यांनी या देशात समाजक्रांती तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्य क्रांती घडवली .ज्या महापुरुषांनी शिक्षणाची कवाडे सर्वाँना खुली करून दिली अश्या सर्व महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन शाळेत झालेच पाहिजे आणि हे आमचे मत आम्ही पुढेही ठामपणे मांडत राहू असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज केले. जागतिक कर्णबधिर दिनानिमित्त समता प्रतिष्ठान संचलित मायबोली निवासी कर्न बधीर शाळेत विद्यार्थ्यांना वैश्विक ओळखपत्रे वाटप आणि ऑडियोमेट्रिक रूमचे उद्घाटन माजी उप मुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी ते बोलत होते
यावेळी विधानपरिषद सदस्य डॉ. सुधीर तांबे, माजी आमदार मारुतीराव पवार, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, अंबादास बनकर, सुनील देवकर, साहेबराव मढवई, वसंत पवार, मोहन शेलार, मकरंद सोनावने, ज्ञानेश्वर दराडे, साहेबराव आहेर, प्रभाकर बोरनारे, समाज कल्याण उपायुक्त भगवान वीर, जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटिल, अमित पटेल,समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अर्जुन कोकाटे, समता प्रतिष्ठानच्या सुधाताई कोकाटे मयबोली निवासी कर्ण - बधीर विद्यालयाचे विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते...
यावेळी ते म्हणाले की, समता प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक उत्तम कार्य प्रा. अर्जुन कोकाटे यांनी उभे केले आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांची शाळा सुरू होऊन आता तब्बल २६ वर्ष झाली आहे यात १२० विद्यार्थी निवासी पद्धतीने शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना एक योग्य शिक्षण देत जात पात न मानता समतेची योग्य वाट ते दाखवत आहेत. प्रा. अर्जुन कोकाटे हे सेवा दलाचे राज्य अध्यक्ष आहेत. अतिशय शांतीप्रिय आणि समतेच्या वाटेने जाणारी ही संघटना असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी विद्यार्थ्यांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की या देशात स्टिफन हॉकिंग नावाच्या थोर शास्त्रज्ञ होऊन गेला. ज्याला २१ व्या वर्षी अपंगत्व आले. तो फक्त २ वर्ष जगेल असे डॉक्टरांनी सांगितले. मात्र त्याच्या आत्मविश्वास आणि जिद्दीने तो ७५ पेक्षा अधिक वर्ष जगला आणि या काळात अनेक शोध लावले आणि जगभरातील सर्व शास्त्रज्ञांना त्यांनी आवाक केले.
यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, प्रा. अर्जुन कोकाटे यांच्या कार्यात अनेक अडचणी येत आहेत मात्र आम्ही कायमच त्यांच्या पाठीशी उभे राहू. आणि यासाठीच मी वैयक्तिक रित्या त्यांच्या या संस्थेला २ लाखाची मदत जाहीर करतो. या शाळेचे किंवा संस्थेचे कुठेही काम अडले असेल तर आमची सर्व मंडळी तुमच्या मदतीला असतील समतेच्या वाटेने जाणाऱ्या प्रत्येकासोबत आम्ही कायमच उभे राहू.
No comments:
Post a Comment