मुंबई, दि. 4: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुनील शिंदे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर उद्या बुधवार दि. 5 ऑक्टोबर आणि गुरुवार दि. 6 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल.
मुंबईच्या कांदिवली परिसरातील ठाकूर विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी श्री. शिंदे यांना उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या निमित्ताने श्री. शिंदे यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील योगदानाविषयी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात माहिती जाणून घेतली आहे. संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना उपयुक्त ठरली असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले. सहायक संचालक सागरकुमार कांबळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
००००
सागरकुमार कांबळे/4.10.2022
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/qcsHCma
https://ift.tt/NEVa8nf
No comments:
Post a Comment