📌 दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी
😇 ‘आदिपुरुष’ महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही, राम कदमांचा इशारा :
भाजप नेते राम कदम यांनी आदिपुरुष या चित्रपटाला विरोध केला आहे. “आदिपुरुष हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. या चित्रपटात निर्मात्यांनी पुन्हा एका किरकोळ प्रसिद्धीसाठी आमच्या देवी देवतांचं विडंबन करुन कोट्यवधी हिंदू लोकांच्या श्रद्धा आणि आस्थेला ठेच पोहोचवली आहे. आता वेळ आली आहे… या विडंबनाचा फक्त माफीनामा.” असे राम कदम यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
🔎 कोणाच्या दसरा मेळाव्याला सर्वाधिक गर्दी? आकडेवारी समोर :
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांच्याही दसरा मेळाव्याला दोन्ही मैदानांमध्ये तुडुंब गर्दी झाली होती. पोलिसांच्या अंदाजानुसार, शिंदे गटाच्या मेळाव्यात सुमारे एक लाख 25 हजारांच्या आसपास लोकांनी हजेरी लावली होती. तर ठाकरे गटाच्या शिवाजी पार्कवरील मेळाव्यात सुमारे 65 हजारांहून अधिक लोक उपस्थित होते. पोलिसांनी दिलेली आकडेवारी ही अंदाजे दिली असून त्यामध्ये तफावत असू शकते.
⚖️ शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक आयोग उद्या निर्णय देणार? :
शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हाचं नेमकं काय होणार याचा निर्णय पुढच्या काही तासात होण्याची शक्यता आहे. उद्या म्हणजे 7 तारखेपर्यंत शिवसेनेच्या दोन्ही गटांना आपली बाजू निवडणूक आयोगात मांडायची आहे. एकीकडे अंधेरीची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे, उद्यापासून अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरु होत आहे. त्यामुळे चिन्हाचा निर्णय काय होतो? याची उत्सुकता आहे.
🗣️ एकनाथ शिंदेना अजित पवारांचे प्रत्युत्तर :
मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी झेंडा शिवसेनेचा, अजेंडा मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा राबवला, अशी टीका केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दसरा मेळाव्यात केली. त्याला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले की, असे काहीही नाही. मंत्री असताना कॅबिनेटमध्ये एकनाथ शिंदे माझ्या उजव्या बाजुलाच बसायचे, तेव्हा ते कधी असे म्हणाल्याचे ऐकले नाही.
😎 फडणवीसांचा उद्धव ठाकरेंच्या भाषणावर खोचक टोला! :
शिंदे आणि ठाकरेंनी केलेल्या भाषणांवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर मीडियाशी बोलताना खोचक शब्दांत टीका केली. तसेच, खरी शिवसेना कोणती, हे एकनाथ शिंदेंनी दाखवून दिल्याचंही ते म्हणाले. “ज्या प्रमाणात लोक बीकेसीच्या मैदानावर पाहायला मिळाले ते पाहाता काल एकनाथ शिंदेंनी हे दाखवून दिलं की खरी शिवसेना कोणती. त्या मैदानाची क्षमता शिवाजी पार्कपेक्षा दुप्पट आहे, असं फडणवीस म्हणाले.
No comments:
Post a Comment