मुंबई, दि. ९ : – रामायण महाकाव्याचे रचनाकार महर्षी वाल्मिकी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.
वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
‘महर्षी वाल्मिकी यांनी रामायण या महाकाव्यातून जगाला आपली महान संस्कृती, तिचे वैभव यांचा परिचय करून दिला. त्यांच्या अलौकिक प्रतिभेमुळे प्रभू श्री रामचंद्रांचे चरित्र सर्वांपर्यंत पोहोचले. महर्षी वाल्मिकींना विनम्र अभिवादन आणि जयंती दिनाच्या शुभेच्छा,’ असेही मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात म्हटले आहे.
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/lX7J9C1
https://ift.tt/u2RWCtA
No comments:
Post a Comment