गंभीर आजारी वृद्धांचे आयुष्य सुसह्य करण्यासाठी दानशूरांनी सहकार्य करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी - latur saptrang

Breaking

Sunday, October 9, 2022

गंभीर आजारी वृद्धांचे आयुष्य सुसह्य करण्यासाठी दानशूरांनी सहकार्य करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई, दि. ९ : समाजातील वृद्ध , निराधार तसेच असाध्य आजारांनी ग्रस्त वयोवृद्ध लोकांचे दुःख दूर करणे अतिशय निकडीचे आहे. या क्षेत्रात आपल्या देशात खूप मोठे काम करण्याची गरज आहे. वृद्ध रुग्णांची सेवा हे दैवी कार्य असून जीवनाच्या संध्याकाळी आजारी रुग्णांचे आयुष्य सुसह्य करण्यासाठी दानशूर लोकांनी तसेच कार्पोरेट्सनी या क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांना सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

गंभीर आजारामुळे अंथरुणाला खिळलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सेवा देणाऱ्या राजे पंचम जॉर्ज स्मृती विश्वस्त संस्थेच्या अधिपत्याखाली ‘सुकून निलाय’ रुग्णसेवा केंद्र व ‘मुंबई उपशामक रुग्णसेवा नेटवर्क’ या संस्थांच्या वतीने मुंबई येथे ‘जागतिक उपशामक रुग्णसेवा’ दिनाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

वृद्ध व निराधार लोकांना  रुग्णसेवा देण्याचे चांगले कार्य मुंबईतील काही संस्था करीत आहेत. या कार्यात मोठे आर्थिक सहकार्य करणाऱ्या सिप्ला फाऊंडेशनचे कौतुक करताना इतर कार्पोरेट्सनी देखील त्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून उपशामक रुग्णसेवा देणाऱ्या संस्थांना मदत करावी, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. यावेळी राज्यपालांनी आपल्या स्वेच्छा निधीतून पंचम जॉर्ज स्मृती विश्वस्त संस्थेला २५ लाख रुपयांची देणगी जाहीर केली.

राज्यपालांच्या हस्ते वांद्रे मुंबई येथे असाध्य कर्करुग्णांना सेवा देणाऱ्या ‘शांती आवेदना’ या संस्थेचे संस्थापक डॉ एल जे डिसुझा तसेच टाटा कर्करोग रुग्णालयातील रेडिएशन ऑनकॉलॉजिस्ट डॉ मेरी ऍन मुकादन यांचा त्यांच्या उपशामक रुग्णसेवा क्षेत्रातील मूलभूत कार्यासाठी  सत्कार करण्यात आला.

पंचम जॉर्ज स्मृती विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष डॉ एरीक बॉर्जेस यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याची माहिती दिली.  सुरुवातीला दिव्यांग प्रौढ मुलांनी नृत्य व नाट्याचे सादरीकरण केले. कार्यक्रमाला संस्थेचे विश्वस्त व सदस्य, दिव्यांग प्रौढ व पालक तसेच संस्थेचे आश्रयदाते उपस्थित होते.

00000

Governor Koshyari appeals to Corporates to support Palliative Care providers

Mumbai, 9 : Stating that there is an urgent need to provide palliative care to the large number terminally ill elderly people in our society, Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari called upon philanthropists and Corporates to extend a generous support to palliative care providers.

The Governor was speaking at the commemoration of the World Hospice and Palliative Care Day, organised by the ‘Sukoon Nilaya Palliative Care Centre’ and the ‘Mumbai Palliative Care Network’ under the auspices of the King George V Memorial Trust in Mumbai.  The Governor announced a donation of Rs.25 lakhs to the Trust on this occasion.

Dr L J de Souza, Founder of ‘Shanti Avedna’ which provides Palliative Care to terminally ill Cancer patients and Dr Mary Ann Muckaden, Radiation Oncologist at Tata Memorial Hospital were felicitated for their pioneering work in Palliative Care.

Dr Eric Borjes, Chairman of King George V Memorial Trust – Anand Niketan, members of the Trust, differently abled adults, caregivers and well wishers were present. The Special adults presented a group dance and a skit on the occasion.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/a6Z9CGk
https://ift.tt/ns4kPXU

No comments:

Post a Comment