क्षुल्लक कारणावरुन ग्रामपंचायत सदस्याला संपवलं; रेशन दुकानदारासोबत वादानंतर झाली भयानक घटना - latur saptrang

Breaking

Friday, October 7, 2022

क्षुल्लक कारणावरुन ग्रामपंचायत सदस्याला संपवलं; रेशन दुकानदारासोबत वादानंतर झाली भयानक घटना

 


क्षुल्लक कारणावरुन ग्रामपंचायत सदस्याला संपवलं; रेशन दुकानदारासोबत वादानंतर झाली भयानक घटना



बीड : बीडच्या अंबाजोगाई शहरालगत असलेल्या चनई ग्रामपंचायत सदस्याचा रेशन दुकानदारासोबत वाद झाला. या वादाची कुरापत काढून दसऱ्याच्या सायंकाळी त्या ग्रामपंचायत सदस्याची तीक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या करण्यात आली. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात १७ जणांवर ॲट्रॉसिटीसह हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात यावी. या मागणीसाठी संतप्त महिलांनी शहर ठाण्याबाहेर ठिय्या मांडला. अखेर अप्पर अधीक्षकांच्या आश्वासनानंतर महिलांनी हे ठिय्या आंदोलन मागे घेतलं. अंबाजोगाई शहरालगतचा चेन्नई हे गाव नेहमीच चर्चेत राहणार असल्याचे नेहमी पाहायला मिळतं. मात्र, रेशन दुकानदारासोबत झालेल्या या घटनेनंतर जवळपास गाव हे भीतीच्या वातावरणामध्ये आणि तणावामध्ये होतं. मात्र, त्यानंतर या घटनेमध्ये जे आरोपी आहेत त्यांना अटक करण्यासाठी पोलीस प्रशासन संत गतीने काम करत असल्याचं गावकऱ्यांना लक्षात आले.

या सगळ्या आरोपींना अटक करण्याची मागणी घेऊन महिलांनी शहर पोलीस ठाणे गाठत त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत पोलीस ठाण्याला घेराव घातला. मात्र, अप्पर अधीक्षकांच्या आश्वासनानंतर या महिलांनी हे ठिय्या आंदोलन मागे घेतलं. या आश्वासनानंतर सगळ्या आरोपींना आम्ही लवकरच ताब्यात घेऊ आणि त्या घडलेल्या गुन्ह्यातील व्यक्तीच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देऊ, असं आश्वासन दिल्याने संतप्त झालेल्या महिला शांत झाल्या.

मेडन फार्म्यास्युटिकल्स कंपनी हरयाणाची आहे. तिनं कॉर्पोरेट कार्यालय दिल्लीत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं अलर्ट जारी केल्यानंतर कंपनीची चौकशी सुरू झाली आहे. कंपनीनं तयार केलेल्या सिरपचा वापर केल्यानं गाम्बियामध्ये ६६ मुलांचा मृत्यू झाला. या मुलांचं वय ५ वर्षांपेक्षा कमी होतं. कफ सिरप घेतल्यानंतरच्या ३ ते ५ दिवसांत ही मुलं आजारी पडली. त्यानंतर त्यांना मृत्यूनं गाठलं.

गाम्बियातील मुलांच्या मृत्यूची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं २९ सप्टेंबरला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला दिली होती. मेडन कंपनीच्या ४ सिरपमध्ये डायथायलीन ग्लायकॉल आणि एथिलीन ग्लायकॉलचं प्रमाण जास्त असल्याचं तपासणीत आढळून आलं. या दोन्ही घटकांचं अधिक प्रमाण आरोग्यासाठी धोकादायक आहे. कारण त्यामुळे अनेक साईड इफेक्ट्स होतात. डायथायलीन ग्लायकॉल आणि एथिलीन ग्लायकॉलच्या अधिकच्या मात्रेमुळे किडनीची समस्या, पोटदुखी, उल्टी, अतिसार, डोकेदुखी यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

No comments:

Post a Comment