लातूर : नागपूर शहरातील एक पेट्रोल पंप चालक हॉटेलमध्ये कुटुंबासह जेवायला गेले. मात्र, जेवण करून घरी परतल्यानंतर घर उघडताच त्यांनी जे पाहिलं त्याने कुटुंबाला धक्काच बसला. जेवणकरून येईपर्यंत चोरट्यांनी घर साफ केलं होतं. अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यासह रोखरक्कम असा एकूण तीन लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि घरातील कपाटामध्ये ठेवलेली रोख रक्कम व सोन्याच्या अंगठ्या, चांदीची मूर्ती, किंमती घड्याळ असे एकूण ३ लाख ७६ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला. मयूर यशवंतराव पाटील जेव्हा कुटुंबासह घरी परत आले. तेव्हा त्यांच्या घरी हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तात्काळ शिवाजी नगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या चोरीच्या प्रकरणाचा पंचनामा केला. मयूर पाटील यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरी प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे करत आहेत.
No comments:
Post a Comment