मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नागपूर विमानतळावर स्वागत - latur saptrang

Breaking

Tuesday, October 25, 2022

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नागपूर विमानतळावर स्वागत

नागपूर दि. २५ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज एक दिवसीय गडचिरोली दौऱ्यासाठी नागपूर विमानतळावर आगमन झाले. नागपूर विमानतळावर स्वागत स्वीकारून त्यांनी गडचिरोलीकडे हेलिकॉप्टरने प्रयाण केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नागपूर येथे विशेष विमानाने सकाळी आगमन झाले. नक्षलवादासोबत सामना करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भामरागड परिसरातील धोडराज पोलीस चेक पोस्ट येथे पोलीस दलासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी ते आज येथे आले होते. नागपूरवरून भामरागड या भागातील दौऱ्यासाठी ते हेलिकॅप्टरने रवाना झाले. दुपारी ३ नंतर गडचिरोली जिल्हातील कार्यक्रम आटपून ते मुंबईला प्रयाण करतील.
मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे दुसऱ्यांदा गडचिरोली जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहेत. यापूर्वी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गडचिरोली जिल्हयाचा दौरा केला होता.तत्पूर्वी त्यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही जबाबदारी घेतली होती.
आज नागपूर विमानतळावर खासदार कृपाल तुमाणे, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदरी,अतिरिक्त आयुक्त माधवी खोडे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज कुमार सूर्यवंशी,अतिरिक्त पोलीस आयुक्त अश्वती दोरजे,गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील आदींची उपस्थिती होती.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/AXZzcpR
https://ift.tt/dILumqg

No comments:

Post a Comment