तुळशी विवाहपर्यंत 'आनंदाचा शिधा' घरोघरी पोहचणार - latur saptrang

Breaking

Tuesday, October 25, 2022

तुळशी विवाहपर्यंत 'आनंदाचा शिधा' घरोघरी पोहचणार

 दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी





🗣️ तुळशी विवाहपर्यंत 'आनंदाचा शिधा' घरोघरी पोहचणार : 


तुळशी विवाहपर्यंत आपली दिवाळी असते. त्यामुळे उशिरा का होईना पण 'आनंदाचा शिधा'  घरोघरी पोहचणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि कोल्हापूरचे पालक मंत्री दीपक केसरकर यांनी केले. आम्ही लोकांची दिवाळी गोड केली असल्याचा दावाही त्यांनी केला. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. दिवाळीसाठी शिंदे-फडणवीस सरकारने आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर केले होते. यात दिवाळीसाठी रेशनिंग दुकानातून 100 रुपयांत रवा, साखर, गोडेतेल, चणाडाळ या वस्तू आनंदाचा शिधा म्हणून देण्याची घोषणा करण्यात आली होती. 


😎 मंत्री दादा भुसेंचे धाडस: दरोडेखोराला पकडले :


मंत्री दादा भुसे यांच्या धाडसी स्वभावाचा परिचय नुकताच नाशिककरांना आला. नाशिकमध्ये एका बंगल्यात दरोडा घालण्याच्या उद्देशाने काल तीन जण पिस्तुल घेऊन शिरले. तेव्हा घरातील तीन महिलांना त्यांनी पिस्तुलचा धाक दाखवत धमकावलेदेखील. मात्र, महिलांनी आरडाओरड केल्याने नागरिकांनी या बंगल्याकडे धाव घेतली. तेव्हा दादा भुसेही त्याच परिसरात होते. त्यांनी तातडीने थेट बंगल्यात धाव घेतली व महिलांना बाहेर काढले. नंतर बंगल्यात लपलेल्या एका दरोडेखोराला शरण येण्याचे आवाहन केले. दोन तासानंतर लपलेला चोरटा शरण आला. त्याला कार्यकर्त्यांनी चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.


🚨 भास्कर जाधव यांचा अटकपूर्व जामीन मंजूर :


शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांना पुण्याच्या सत्र न्यायालयानं दिलासा दिला आहे. कोर्टानं त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. डेक्कन पोलीस स्टेशन इथं त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. कुडाळ इथं आमदार वैभव नाईक यांच्याविरुद्ध चाललेल्या कारवाईचा दाखला देताना भास्कर जाधव यांनी आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे व त्यांचे पुत्र नितेश राणे यांच्याविरोधात सडकून टीका केली होती. 



⚡ तांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सअ‍ॅप झालं डाऊन :


जगभरात कोट्यवधी युजर्स असणारं व्हॉट्सअ‍ॅप भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी दुपारी 12च्या सुमारास डाऊन झालं. त्यामुळे जगभरातील युजर्स ट्विटरवर येऊन यासंदर्भात ट्वीट्स करू लागले आहेत. काही तांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मेसेजेस पाठवता येत नसून फक्त पर्सनल चॅटची सुविधा युजर्सला वापरता येत नसल्याचं समोर आलं आहे.


🎾 सेरेना विल्यम्सने निवृत्तींच्या अफवांवर लावला पूर्णविराम :


टेनिस विश्वातील अव्वल दर्जाची महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्स तिच्या टेनिस कारकीर्दीला अलविदा करुन निवृत्त होणार अशा अनेक चर्चा मागील काही काळापासून रंगल्या होत्या. पण आता तिने स्वत:च तिच्या निवृत्तीबद्दल महत्त्वाची माहिती देत लवकरच टेनिस कोर्टावर पुनरागमनाचे संकेत देखील दिले आहेत. सेरेना म्हणाली की, 'मी निवृत्ती घेतलेली नाही. माझ्या नक्कीच पुनरागमन करेल. तुम्ही माझ्या घरी येऊन पाहू शकता. माझ्या घरातच टेनिस कोर्ट आहे.


🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!



No comments:

Post a Comment