अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत ६४७ मेट्रिक टन नियतन मंजूर - latur saptrang

Breaking

Tuesday, October 25, 2022

अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत ६४७ मेट्रिक टन नियतन मंजूर

मुंबई, दि. २५ : मुंबई – ठाणे शिधावाटप क्षेत्रासाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना लाभार्थ्यांसाठी डिसेंबर २०२२ करिता १८५१२ लाभार्थ्यांकरिता २७७ मेट्रिक टन गहू, ३७० मेट्रीक टन तांदूळ असे एकूण ६४७ मेट्रिक टन नियतन शासनाकडून प्राप्त झाले असल्याची माहिती नियंत्रण शिधावाटप व संचालक नागरीपुरवठा यांनी दिली आहे.

मुंबई व ठाणे शिधावाटप क्षेत्रात डिसेंबरसाठी परिमंडळ अ, ड, ई, ग, फ मध्ये अत्योंदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांसाठी प्रति शिधापत्रिकाधारकास गहू २ रू किलो आणि तांदूळ ३ रू किलो प्रमाणे १५ किलो गहू आणि २० किलो तांदूळ असे एकूण ३५ किलो धान्य वितरित करण्यात येणार आहेत.

डिसेंबर २०२२ करिता शासनाकडून प्राप्त अंत्योदय अन्न योजनेचे परिमंडळ  ड, ई, ग कार्यालयांच्या विक्रीच्या अहवालानुसार आवश्यकतेपेक्षा कमी असल्याने सदर परिमंडळ कार्यालयास शासनाकडून प्राप्त नियतनाच्या मर्यादेत नियतन मंजूर करण्यात आले आहे. तसेच उर्वरित अ व फ परिमंडळ कार्यालयांना तांदूळ व गव्हाचे सप्टेंबर २०२२ करिता अहवालानुसार १०० टक्के प्रमाणे नियतन मंजूर करण्यात आले आहे.

००००



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/5kjU68V
https://ift.tt/dILumqg

No comments:

Post a Comment