पोटरा, तिचं शहर होणं, पाँडीचेरी, राख आणि पल्याड या चित्रपटांची गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा - latur saptrang

Breaking

Saturday, October 15, 2022

पोटरा, तिचं शहर होणं, पाँडीचेरी, राख आणि पल्याड या चित्रपटांची गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

मुंबई, दि.१४: गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फिल्म मार्केट २०२२ मध्ये महाराष्ट्र शासनाकडून पाठवायच्या ५ मराठी चित्रपटांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून पोटरा, तिचं शहर होणं, पाँडीचेरी, राख आणि पल्याड या चित्रपटांची निवड झाल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले आहे.

सदर ५ मराठी चित्रपटांच्या निवडीसाठी ५ तज्ज्ञांची समिती गठित करण्यात आली होती. या समितीत निर्माती अभिनेत्री किशोरी शहाणे वीज, एफटीआयआय चे धीरज मेश्राम, युनेस्को चे ज्युरी मनोज कदम , चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर, चित्रपट लेखक व दिग्दर्शक महेंद्र तेरेदेसाई यांचा समावेश होता. या समितीने दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे २५ चित्रपटांचे परीक्षण करत या ५ चित्रपटांची निवड केली आहे. हे चित्रपट गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होणार आहेत. या महोत्सवासाठी प्रत्येक चित्रपटाचे दोन प्रतिनिधी या प्रमाणे ५ चित्रपटाचे १० प्रतिनिधी पाठविण्यात येणार आहे.

या चित्रपटांच्या निर्मात्यांचे व संपूर्ण चमुचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे व शुभेच्छा दिल्या आहेत.

00000



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/XfUTKan
https://ift.tt/evBjNPM

No comments:

Post a Comment