खाकी वर्दीत गाण्यावर धरला ताल; Tik-Tok स्टार लेडी कंडक्टरवर एसटी महामंडळाची मोठी कारवाई - latur saptrang

Breaking

Wednesday, October 5, 2022

खाकी वर्दीत गाण्यावर धरला ताल; Tik-Tok स्टार लेडी कंडक्टरवर एसटी महामंडळाची मोठी कारवाई





 उस्मानाबादः कर्तव्यावर असताना रिल्स बनवणे टिक टॉक स्टारला चांगलेच महागात पडले आहे. एसटी महामंडळात लेडी कंटक्टर असलेल्या महिलेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत महिला कंडक्टरवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. (lady conductor suspended news)


उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब आगारातील महिला कंडक्टर टिक टॉक स्टार मंगल सागर गिरी यांना एसटी महामंडळाने अखेर निलंबित केले. मंगल सागर गिरी यांनी कर्तव्यावर असताना रिल्स बनवले त्यामुळे एस टी महामंडळाची बदनामी झाली असा ठपका मंगल सागर गिरी यांच्यावर ठेवलाय.

मंगल सागर गिरी यांचे फेसबुक, इंन्स्टाग्रामवर लाखो चाहते आहेत. त्यांच्या रिल्सला लाखो व्ह्यू मिळतात. वेगवेगळ्या गाण्यावर, वेगवेगळ्या विषयावर मंगल सागर गिरी यांनी रिल्स बनवले असुन फेसबुक, इंन्स्टाग्रामवर त्याच्या रिल्सवर अनेक लाइक्स व कमेंट आल्या आहेत.

एसटी महामंडळाचा ड्रेस घालून तुळजाभवनी देवीच्या गाण्यावर मंगल गिरी यांनी एक व्हिडिओ बनवला होता. या व्हिडिओ तुफान गाजला होता. त्याला लाखो व्ह्यू आणि कमेंट होत्या. मात्र, त्यांच्या याच व्हिडिओवर आक्षेप घेत एसटी महामंडळाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. तसंच, मंगल यांचा हा व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या सहकाऱ्यालाही निलंबित करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment