हिंगोली: कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील मागील २२ दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा मृतदेह डोंगरकडा उपबाजारपेठेच्या पत्राच्या खोलीत गळफास घेतलेल्या स्थितीत बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास आढळून आला. यावेळी पोलिसांनी त्याचा मोबाईल तपासला असता त्याने आत्महत्या कशी करावी तसेच कोणत्या प्रकारामुळे विनात्रास मृत्यू येतो याबद्दल युट्यूबवर सर्च केल्याचे स्पष्ट झाले आहे.
आज दुपारी डोंगरकडा येथील उपबाजारपेठेच्या टिनपत्राच्या खोलीत साफसफाई करण्यासाठी कर्मचारी गेले असता त्या ठिकाणी एका तरुणाचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. मात्र त्या ठिकाणी केवळ सापळाच दिसून आला. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शेख बाबर, प्रभाकर भोंग, शेख शाहेद, मुलगीर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी आढळून आलेल्या कपड्यांवरून सदर मृतदेह प्रशांत मोरेचा असल्याचे स्पष्ट झाले. यावेळी पोलिसांनी त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता युट्यूबवर आत्महत्या कशी करावी, कोणत्या प्रकारे आत्महत्या केल्याने कमी त्रास होतो, दोन दिवस मृतदेह सापडू नये यासाठी ठिकाण कसे निवडावे याची माहिती घेतल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतरच त्याने गळफास घेतल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
आर्थिक परिस्थितीमुळे उचलले पाऊल
मयत प्रशांत याच्याकडे शेती नाही. त्यामुळे आई, वडील रोज मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. प्रशांत याने पार्टटाईम जॉब कसा करायचा, शेअर बाजारात १००० रुपये गुंतवले किती रुपये मिळतात याची माहितीही युट्यूबवर घेतल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.घरची आर्थिक परिस्थिती व शिक्षणावर होणाऱ्या खर्चामुळे त्याने हे पाऊल उचलले असल्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे.

No comments:
Post a Comment