💁♂️ राज्यातील 1 हजार 165 ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरू :
आज राज्यातील 1 हजार 165 ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. राज्यातील 18 जिल्ह्यांच्या 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठी होणार आहे. मतदान होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदूरबार, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
👀 राऊतांमुळे आमच्यात आणि ठाकरेंमध्ये दरी; शहाजीबापूंची टीका :
आमच्यात आणि उद्धव ठाकरे यांच्या जी दरी पडली, त्यामध्ये शिवसेनेतील दोन राऊतांचा मोठा वाटा आहे. तसेच, आणखी दोघे-तिघे यासाठी कारणीभूत आहे, असे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी म्हटले. आता संजय राऊत यांच्यासोबतच खासदार विनायक राऊत यांनाही शहाजीबापूंनी लक्ष्य केले.
🗣️ कामांच्या मुद्द्यावर मागा; मनसेचं शिवसेनेला चॅलेंज :
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्यक्त न झालेल्या संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. सहानुभूतीच्या आधारे मत न मागता कामाच्या आधारे मागा, असे चॅलेंजही त्यांनी दिले. देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारमधील उद्धव ठाकरेंचं काम आणि मुंबईत महापालिकेत होत असलेल्या भ्रष्ट्राचारावर भाष्य केलं.
🍺 गोव्यात बिअर महागणार; अधिसूचना जारी :
गोवा सरकारने बिअरवरील अबकारी करात 10 ते 12 रूपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गोव्यात आता प्रती लिटर घाऊक बिअरमागे दहा रूपये अधिक मोजावे लागणार आहेत. याविषयीची अधिसूचना वित्त खात्याचे अवर सचिव प्रणब भट यांनी जारी केली आहे. वाढलेल्या दरांमुळे सरकारला अतिरिक्त 50-55 कोटींचा महसूल मिळू शकेल. प्रति 330 मिमी बाटलीच्या दरात 7-8 रुपयांची वाढ होणार आहे.
🏏 टी-20 वर्ल्डकमधील भारत-पाकिस्तान सामना रद्द? :
टी-20 विश्वचषकातील वेळापत्रकानुसार स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ 23 ऑक्टोबर रोजी आमने-सामने येणार आहेत. हा सामना भारतीय वेळानुसार दुपारी दीड वाजता सुरू होणार आहे. मात्र या सामन्यावर अनिश्चिततेचे सावट आहे. 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्नमध्ये दिवसभर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. माहितीनुसार, पावसाचा जोर एवढा असेल की त्यामुळे नाणेफेक होणेही कठीण मानले जात आहे.
No comments:
Post a Comment