मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या कडून शिवणी, गौर मसलगा येथील अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीची पाहणी - latur saptrang

Breaking

Monday, October 4, 2021

मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या कडून शिवणी, गौर मसलगा येथील अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीची पाहणी



           महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते मा देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते मा प्रवीणजी दरेकर यांनी आज सोमवारी सकाळी औसा तालुक्यातील शिवनी आणि निलंगा तालुक्यातील गौर मसलगा येथील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी केली त्याचबरोबर शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

          यावेळी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड खा सुधाकर संगारे आ अभिमन्यू पवार प्रदेश भाजपाचे सचिव अरविंद पाटील निलंगेकर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments:

Post a Comment