मुंबई, दि. ३१ : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे अभिवादन करून आदरांजली अर्पण केली.
वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पुण्यतिथी निमित्त राष्ट्रीय संकल्प दिवस पाळण्यात येत आहे. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री म्हणतात, दिवंगत इंदिराजींनी आधुनिक भारताच्या उभारणीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. देशाचा सर्वांगीण विकास हा त्यांचा ध्यास होता. त्यांचा हा ध्यास पूर्ण करण्याचा आणि एकात्म, बलशाली राष्ट्र उभारणीचा आपण संकल्प करूया.’
0000
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3CA2CeY
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment