शेतकऱ्यांच्या अन्नत्याग आंदोलनास व्हीएस पँथर्स चा जाहीर पाठींबा - latur saptrang

Breaking

Thursday, October 14, 2021

शेतकऱ्यांच्या अन्नत्याग आंदोलनास व्हीएस पँथर्स चा जाहीर पाठींबा




 लातूर : लातूर येथे माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या ७२ तास अन्नत्याग आंदोलनास व्हीएस  पँथर्सने आपला जाहीर पाठिंबा दिला .लातूरच्या शिवाजी चौकात दि. ११ ते १३ ऑक्टोबर दरम्यान शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदर अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला व्हीएस पँथर्सचे संस्थापक अध्यक्ष   विनोद खटके यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शेकडो युवकांसमवेत डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क येथुन लॉंग मार्च करत जाहीर पाठिंबा दिला. यावेळी आपले विचार व्यक्त करताना  विनोद खटके यांनी सरकारने आता जागे होऊन शेतकरी आणि शेतमजूर यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला.

यावेळी विनोद खटके यांच्यासोबत शेकडो युवकासह  संपर्क प्रमुख आनंद जाधव,किरण पायाळ, असद शेख,निलेश कांबळे, ग्रूप अध्यक्ष अमोल कांबळे, गौस शेख ,महेश माने,सोनू कांबळे, अहमदपूर तालुका  अध्यक्ष सय्यद मोहम्मद साब, चाकूर   तालुका  अध्यक्ष शरद किणीकर, देवणी   तालुका  अध्यक्ष बालाजी बनसोडे, उदगीर  तालुका  अध्यक्ष किरण किडवंचे ,करण कांबळे जिल्हा अध्यक्ष वाहतूक ,रेणापूर   तालुका   अध्यक्ष राज मस्के , औसा  तालुका   अध्यक्ष पंकज होळीकर सह अतुल होळकर ,सूरज सूर्यवंशी ,मनोज गायकवाड, पंकज पाचपिंडे ,श्रीहरि केंद्रे सह जिल्ह्यातील शेकडो युवक कार्यकर्ते उपस्थित होते. 


‘मी चाकणकरांना शुर्पणखा म्हटलेले नाही
इंधन दरवाढीचा भडका सुरूच; दोन दिवस विश्रांती दिल्यानंतर पुन्हा दरवाढ
करोना मृतांच्या कुटुंबांना दरमहा ५००० रुपयांची मदत! 'या' राज्याचा निर्णय
मराठवाडा विरोधी सरकारची नौटंकी बंद करणार-आ.संभाजी पाटील निलंगेकर


No comments:

Post a Comment