५ हजारांच्या डिस्काउंटसह खरेदी करू शकता Vivo चा ‘हा’ शानदार स्मार्टफोन, मिळतो ५०MP कॅमेरा - latur saptrang

Breaking

Friday, October 8, 2021

५ हजारांच्या डिस्काउंटसह खरेदी करू शकता Vivo चा ‘हा’ शानदार स्मार्टफोन, मिळतो ५०MP कॅमेरा



 नवी दिल्ली :Vivo X70 Pro स्मार्टफोनला स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. Flipkart Big Billion Days सेलमध्ये या फोनवर बंपर सूट दिली जात आहे. डिव्हाइसवर प्रमुख बँकांकडून ३ हजार रुपये सूट मिळत आहे. सोबतच, फ्लिपकार्टवरुन खरेदी केल्यास ५ हजार रुपये स्पेशल डिस्काउंट मिळेल. फोनच्या मुख्य फीचर्सबद्दल सांगायचे तर यात कर्व्ड एमोलेड स्क्रीन दिली आहे, याशिवाय ५० मेगापिक्सल क्वाड रियर कॅमेरा सेटअप आणि ४,४५० एमएएचची पॉवरफुल बॅटरी मिळते.


Vivo X70 Pro ची किंमत

Vivo X70 Pro च्या ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ४६,९९० रुपये, १२ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ४९,९९० रुपये आहे. फोन कॉस्मिक ब्लॅक आणि Aurora Dawn रंगात येतो.




Vivo X70 Pro ऑफर

Vivo X70 Pro स्मार्टफोनच्या खरेदीवर Axis बँकेकडून ३ हजार रुपये डिस्काउंट मिळते. तर ICICI बँक १० टक्क्यांपर्यंत सूट देत आहे. याशिवाय फोनवर १५,००० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. फोनला दरमहिना ३,९१६ रुपये देऊन नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदी करू शकता. डिव्हाइसवर ५ हजार रुपये स्पेशल डिस्काउंट देखील मिळेल.

latursaptrang

Vivo X70 Pro चे स्पेसिफिकेशन

Vivo X70 Pro स्मार्टफोनमध्ये ६.५६ इंचाचा एफएचडी प्लस कर्व्ड एमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. याची स्क्रीन एचडीआर सपोर्ट करते. यात ३.० GHz ऑक्टा-कोर Dimensity १२०० प्रोसेसर दिला आहे. डिव्हाइस अँड्राइड ११ आधारित फनटच १२ वर काम करते.
latursaptrang


फोटोग्राफीसाठी यात क्वाड रियर कॅमेर सेटअप मिळतो. याचा पहिला कॅमेरा ५० मेगापिक्सल, दुसरा १२ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस, तिसरा १२ मेगापिक्सल सेंसर आणि चौथा ८ मेगापिक्सल डेप्थ सेंसर आहे. सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.

latursaptrang


बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी

Vivo X70 Pro स्मार्टफोनमध्ये ४४ वॉट फ्लॅश चार्जर सपोर्टसह ४,४५० एमएएचची बॅटरी दिली आहे. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरसह वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ, हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट फीचर्स मिळतात.


सिंदखेडराजा व इतर पर्यटनस्थळ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

पर्यावरण जपून शाश्वत विकास गरजेचा – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे


No comments:

Post a Comment