मोफत मुत्ररोग चिकित्सा व उपचार शिबीर
रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचा पुढाकार
लातूर/प्रतिनिधी:रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनच्या पुढाकारातून रविवार दि.६ फेब्रुवारी रोजी मोफत मुत्ररोग चिकित्सा व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
ममता यूरोलॉजी सेंटरच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊन,ममता हॉस्पिटल व गोकुळ प्रतिष्ठान बाभळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरात दारिद्र्य रेषेखालील रुग्णांना गरज असेल तर मोफत शस्त्रक्रियाही केल्या जाणार आहेत.मूत्ररोग तज्ञ डॉ.विश्वास कुलकर्णी व डॉ.अमोल लोंढे हे रुग्णांची तपासणी करणार आहेत. रविवार दि.६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते ४ या कालावधीत ममता हॉस्पिटल,मित्र नगर,लातूर येथे हे शिबीर होणार आहे.
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर २०रुग्णांच्या शस्त्रक्रिया या शिबिरात केल्या जाणार आहेत. त्यासाठी दि.५ फेब्रुवारी पर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक असून दि.६ रोजी तपासणी करून उपचारासाठी निवड केली जाणार आहे. शस्त्रक्रियेसाठी रुग्णाकडे दारिद्र रेषेखाली असल्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.ज्यांच्याकडे असे प्रमाणपत्र नसेल अशा रुग्णांना रक्त तपासणी, एक्स-रे तसेच शस्त्रक्रियेमध्ये २५ टक्के सवलत दिली जाणार आहे.गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.नोंदणीसाठी २४३४९३,२५४३०१,२५४३०२, ९९६०६४३४९३ या क्रमांकावर संपर्क साधावा,
असे आवाहन रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊनचे अध्यक्ष सतीश कडेल,सचिव दिनेश सोनी व अनिल टाकळकर,ह्युमन डेव्हलपमेंट डायरेक्टर श्रद्धानंद अप्पशेट्टी, प्रोजेक्ट डायरेक्टर भावेश गांधी यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment