जिल्ह्यातील आयएमच्या कार्यकारिणी बरखास्त
लातूर / एमआयएमच्या सर्व कार्यकारणी बरखास्त करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष ॲड. मोहम्मद अली शेख यांनी दिली.
लातूर जिल्ह्यात एमआयएम पक्ष वाढीसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. कार्यकर्त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्याचा प्रयत्न करत पक्ष वाढीसाठीचे कार्य गतिमान केले जाणार आहे. त्यासाठी विद्यमान सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्याच्या सूचना एमआयॲम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील, महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष डॉ. अब्दुल गफार कादरी यांनी केल्या होत्या. त्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष ॲड. मोहम्मद अली शेख यांनी जिल्ह्यातील लातूर जिल्ह्यातील शहर, तालुका , महिला, युवा आदि सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच ते जिल्ह्याचा दौरा करतील आणि कार्यकारणीसाठी नवीन अर्ज स्वीकारतील. पक्ष वाढीसाठी जे कार्यकर्ते सक्रिय काम करतील अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्ष कार्यकारणी मध्ये महत्त्वाचे स्थान दिले जाईल अशीही माहिती एडवोकेट मोहम्मद अली शेख यांनी दिली.
No comments:
Post a Comment