"वर्गात पगडी नको"; बंगळुरुतील कॉलेजची शीख विद्यार्थ्यीनीला सूचना
बंगळुरु : मुस्लीम विद्यार्थीनींनी वर्गात हिजाब (Hijab Row) परिधान करु नये याबाबत कर्नाटक सरकारनं विशेष कायदा आणला आहे. त्यानुसार, अनेक शाळांनी वर्गात शिक्षण घेत असताना हिजाब बंदी लागू केली आहे. यानंतर आता बंगळुरुमधील एका कॉलेजमध्ये एका शीख विद्यार्थ्याला वर्गात असताना डोक्यावर पगडी (Turban Row) उतरवायला भाग पाडलं. या नव्या प्रकारामुळं धार्मिक कपड्यांवरील वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. (Bengaluru college asks Sikh student to remove turban while attending classes)
कर्नाटक हायकोर्टात (Karnataka High Court) हिजाब प्रकरणावर सध्या सुनावणी सुरु आहे. या संदर्भातील अनेक विरोधी याचिकांवर दररोज सुनावणी घेतली जात आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या सुनावण्यांमध्ये हायकोर्टाच्या त्रिसदस्यीय खंडपीठानं म्हटलं होतं की, विद्यार्थ्यांसाठी शाळा-कॉलेजेमध्ये धार्मिक कपडे परिधान करण्याऐवजी शाळेचा गणवेश बंधनकारक आहे. कोर्टाच्या या अंतरिम आदेशानंतर बंगळुरुमधील माऊंट कॅरमल पीयू कॉलेजनं एका १७ वर्षीय अमृतधारी शीख विद्यार्थीनीला वर्गात बसताना डोक्यावरील पगडी घालून बसण्यास सांगितलं.
No comments:
Post a Comment