अत्याचार पिडीत मुलींना न्याय मिळावा व आरोपीला फाशी व्हावी या विषयी जिल्हाध्यक्षा सौ वंदना ताई यांनी घेतली पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांची भेट - latur saptrang

Breaking

Thursday, February 24, 2022

अत्याचार पिडीत मुलींना न्याय मिळावा व आरोपीला फाशी व्हावी या विषयी जिल्हाध्यक्षा सौ वंदना ताई यांनी घेतली पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांची भेट









 अत्याचार पिडीत मुलींना न्याय मिळावा व आरोपीला फाशी व्हावी या विषयी जिल्हाध्यक्षा सौ वंदना ताई यांनी घेतली पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांची भेट


धरणगाव (युसूफ पठाण) येथे  सहा वर्षं वयाच्या चिमुरड्या मुलीवर बलात्कार व तिच्या लहान बहिणीचा विनयभंग करून अत्याचार झालेला आहे . या अत्यंत संतापजनक व निंदनीय घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निषेध करण्यात आला . तसेच संबंधित आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी व हा खटला जलद न्यायालयात चालवण्यात यावा आणि पिडीत कुटुंबाला शीघ्रतेने शासकीय मदत मिळावी . असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांना देण्यात आले . 


सदर निवेदन देतांना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सौ. वंदनाताई चौधरी , महानगर अध्यक्ष अशोकभाऊ लाडवंजारी , युवती जिल्हाध्यक्षा कल्पीता पाटिल , महिला जिल्हा उपाध्यक्ष मिनाक्षीताई चव्हाण , जयश्री पाटील, सुस्मिता पाटील, आशा अंभोरे, दिपीका भामरे, अभिलाषा रोकडे ,महानगर सरचिटणीस सुनीलभाऊ माळी , अमोल कोल्हे , किरण राजपूत , अकिल पटेल , विशाल देशमुख , सुशील शिंदे , दिपीका भामरे , अभिलाषा रोकडे , आशा अंभोरे , सौ. सुष्मीता भालेराव , सौ.जयश्री पाटिल , छाया केळकर , राहुल टोके , सुहास चौधरी , शंभू रोकडे , चंद्रमणी सोनवणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते .

No comments:

Post a Comment