कै. वसंतरावजी देशमुख यांच्या स्मृति पित्यार्थ स्नेहमेळावा गुणगौरव सोहळा संपन्न
श्रीरामपूर (युसूफ पठाण) गत वर्षाप्रमाणे दिनांक 22/ 2/ 2022 रोजी श्रीरामपूर येथील व्हीआयपी गेस्ट हाऊसच्या कॉन्फरन्स हॉल मध्ये महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या वतीने दैनिक सार्वमत या वृत्तपत्राचे संपादक कै. वसंतराव जी देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्नेहमेळावा व गुणगौरव सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीरामपूर येथील प्रसिद्ध उद्योजक अभयजी बाफना हे होते कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक करण दादा सासाने, साई संस्थान चे संचालक सचिन भाऊ गुजर, पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष शेख बरकत अली, पत्रकार संघाचे महासचिव शेख फकीर मोहम्मद, पत्रकार संघाचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष विलासराव पठारे, मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष अरुण त्रिभुवन, पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राज मोहम्मद के. शेख, नाशिक जिल्हाध्यक्ष उस्मान भाई शेख, पत्रकार संघाचे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद, अहमदनगर उत्तर जिल्हा अध्यक्ष राज मोहम्मद आर. शेख, ज्येष्ठ पत्रकार आमीन भाई शेख, नासिक जिल्हा कार्याध्यक्ष मन्सूर भाई पठाण, उत्तर जिल्हा उपाध्यक्ष सय्यद एजाज, उत्तर जिल्हा कार्याध्यक्ष कासम शेख, राहुरी फॅक्टरी येथील पत्रकार जावेद भाई शेख आदी मान्यवर उपस्थित होते सर्वप्रथम कार्यक्रमात कै. वसंतराव जी देशमुख यांच्या स्मृतीस करण दादा ससाने यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज मोहम्मद के. शेख यांनी केले तर प्रास्ताविक उस्मान भाई शेख यांनी केले यावेळी करण दादा सासाने, सचिन भाऊ गुजर, शेख बरकत अली, अभयजी बाफना, विलासराव पठारे, मन्सूर भाई पठाण, सुखदेव केदारे, कासम भाई शेख, आदींनी मार्गदर्शन पर भाषणे केली यावेळी पत्रकार संघाच्या वतीने उत्कृष्ट पत्रकारिता करणाऱ्या प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच औरंगाबाद, नाशिक, चांदवड, येवला, संगमनेर, राहुरी आदि गावाकडून आलेल्या पत्रकारांचा सत्कार करून स्वागत करण्यात आले यावेळी आपल्या प्रमुख भाषणात करण दादा सासाने म्हणाले की वसंतराव देशमुख व जयंतराव ससाणे यांची फार जवळीक होती शहरातील शांतता व सुव्यवस्था अडचणीत आल्यास या दोघांमध्ये चर्चा व विचारविनिमय होत होता श्रीरामपूरची जडण-घडण वसंतराव देशमुख यांनी दैनिक सार्वमत च्या वृत्तपत्राद्वारे घडविलि असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही त्यांनी वृत्तपत्रातून सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, राजकीय व शेती विषयक लिखाण करून नागरिकांना नवीन दिशा दाखविण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे जयंतराव ससाणे यांनी नगरपालिकेत आर्थिक तरतूद करून दरवर्षी वसंतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली होती यावरून देशमुख साहेबां बद्दल चा आदर व प्रेम या कार्यक्रमातून दिसून येत तसाच कार्यक्रम या पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी घेण्यात येत असल्याने त्यांनी पत्रकार संघाचे कौतुक केले साई संस्थान चे संचालक सचिन भाऊ गुजर यांनी आपल्या भाषणात जयंतराव ससाणे व वसंतरावजी देशमुख यांनी केलेल्या कामाच्या आठवणी करून दिल्यात तसेच वसंतराव देशमुख यांनी दैनिक सार्वमत चे माध्यमातून तालुक्यातील अनेक नेते घडविल्याचे सांगितले अभय बाफना यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की वसंतराव देशमुख व बाफना परिवार यांच्यात घनिष्ठ संबंध होते सुरुवातीच्या काळात सार्वमत वृत्तपत्रातील कामगारांचा पगार देण्यास अडचण निर्माण होत असे त्यावेळी वसंतराव जी देशमुख हक्काने पगारासाठी आमच्याकडून पैसे नाहीत असे आणि त्यांनी प्रयत्न करून अथक परिश्रमातून दैनिक सार्वमत या वृत्तपत्राचे नावलौकिक वाढविले महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघ गेल्या तीन दशकांपासून उत्कृष्ट कार्य करीत असून पत्रकार संघाच्या चांगल्या कार्यामुळे आपण अनेक वर्षापासून या पत्रकार सांघा सोबत असल्याचे त्यांनी सांगितले वसंतराव देशमुख यांनी श्रीरामपूरच्या औद्योगिक वसाहतीचे विकासी करण घडविण्याच्या दृष्टीने लिखाण केलेले आहे औद्योगिक वसाहत व एम आय डी सी मधील कारखाने चांगल्या स्वरूपात चालावे त्यांचा विकास व्हावा ज्यामुळे श्रीरामपूरची बाजार पेठ फुलेल याबाबत त्यांनी नेहमी विचार केला स्वर्गीय जयंतराव ससाणे यांच्या विकास कार्याचा उल्लेख देखील त्यांनी आपल्या भाषणातून केला कार्यक्रमात विलासराव पठारे, अरुण त्रिभुवन, राज मोहम्मद शेख, राज मोहम्मद आर. शेख, इब्राहिम शेख, उस्मान भाई शेख, सुखदेव केदारे, सूर्यकांत गोसावी, दादा भाऊ मोरे, सखाराम पगारे, राहुल गायकवाड, अब्दुल्ला भाई चौधरी, शहानुर बेगमपूरे, दस्तगीर शहा, रफिक शेख, सय्यद अकील नबाब, इम्रान सरदार शेख, इब्राहिम शेख, हाजी शकील भाई शेख, सलीम भाई शेख, सय्यद एजाज, मोहम्मद अली सय्यद, मन्सूर भाई पठाण, आदी पत्रकारांसह इतरांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले याचबरोबर श्रीरामपूर येथील डॉक्टर त्रिभुवन यांना पत्रकार संघाच्यावतीने कोरोना योद्धा हे सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमास पत्रकार आमीन भाई शेख, सलाउद्दीन शेख, बि. के. सौदागर, शब्बिर भाई कुरेशी, जावेद भाई शेख, जमीर अहमद शेख, मुसा सजन अली सय्यद, नवनाथ दादा खुरसने, रफिक सय्यद, अमीर बेग मिर्झा, शफिक शेख, सद्दाम मनियार, अकबर भाई शेख, अक्रम कुरेशी, मोहसीन ब. शेख,यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते उपस्थितांचे आभार असलम बिनसाद यांनी मानले
No comments:
Post a Comment