मुंबई : नवाब मलिक यांच्याकडून सातत्यानं भाजपाच्या चुकीच्या कारवायांविरोधात बोलत आहेत. भाजपकडून कसा अन्याय होतोय हे सांगत आहेत. त्यामुळं त्याचं तोंड बंद करण्यासाठी त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळं त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्न येत नाही, अशा शब्दांत मंत्री छगन भुजबळ यांनी महाविकास आघाडीची भूमिका मांडली. नवाब मलिक यांना ईडीनं अटक केल्यानंतर शरद पवारांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीनंतर महाविकास आघाडीनं आपली भूमिका स्पष्ट केली.
भुजबळ म्हणाले, ही दुर्देवाची गोष्ट आहे की, पहाटे नवाब मलिक यांच्या घरी ईडीचे लोक गेले. तिथून त्यांना घेऊन ते सकाळी सहा वाजत्या आपल्या ऑफिसमध्ये घेऊन गेले. यानंतर चौकशी करुन त्यांना कोर्टात घेऊन गेले. दरम्यान, सन १९९२ सालच्या घटना तसेच सन १९९९ सालच्या जागेचा करार आणि त्यानंतर बारा वर्षांनी पीएमएलएचा जन्म झाला. तत्पूर्वी या घटनांमध्ये अनेकांवर कारवाया झाल्या पण यामध्ये नवाब मलिकांचं नाव कुठेही नव्हतं. मग आत्ताच त्यांच्यावर कारवाई का केली जातेय. तर नवाब मलिक हे सातत्यानं भाजपाच्या चुकीच्या कारवायांविरोधात बोलत आहेत. भाजपकडून कसा अन्याय होतोय हे सांगत आहेत. त्यामुळं त्याचं तोंड बंद करण्यासाठी त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment