युक्रेनमध्ये NOTAM जारी; भारतीयांना आणायला गेलेलं विमान अर्ध्यातूनच परतलं
नवी दिल्ली - रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. यावेळी विमानतळ आणि लष्करी ठिकाणांना टार्गेट कऱण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव युक्रेननं (Ukraine) त्यांचे हवाई क्षेत्र बंद केले आहे. परिणामी भारतीयांना (India) आणण्यासाठी गेलेलं विमान परत येत आहे. एअर इंडियाच्या (Air India) विमानाने युक्रेनची राजधानी किवला जाण्यासाठी उड्डाण केलं मात्र आता ते दिल्लीला परत येत आहे. याबाबत एअरलाइन्सच्या प्रवक्त्यांनी माहिती देताना म्हटलं की, एअर इंडियाचं AI 1947 विमान परत येत आहे. कारण किवमध्ये NOTAM जारी करण्यात आले आहे.
युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी एअरमनना नोटीस जारी केली आहे. यानुसार गुरुवारी सकाळी युक्रेनमधील सर्व नागरी विमान उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे. एअर इंडिया आणि केंद्र सरकारने या नोटिसीनंतर विमान दिल्लीला परत बोलावण्याचा निर्णय घेतला. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दिल्लीला परतण्यासाठी विमानाने इराणच्या हवाई क्षेत्रात युटर्न घेतला.
No comments:
Post a Comment